• Home
  • सफेद काँलर वाल्यांसह, गुन्हेगारांनी दुसरा उद्योग बघावा :- पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश

सफेद काँलर वाल्यांसह, गुन्हेगारांनी दुसरा उद्योग बघावा :- पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश

🛑 सफेद काँलर वाल्यांसह, गुन्हेगारांनी दुसरा उद्योग बघावा :- पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पिंपरी :⭕- पिंपरी-चिंचवड शहराची ओळख ही उद्योगनगरी, शैक्षणिक नगरी आणि आयटी हब अशी आहे. या शहरात कायद्याचे पालन करणारे अनेकजण आहेत, मात्र काही मोजक्या गुन्हेगार, व्हाईट कॉलर गुन्हेगार, लँड माफिया, दादा-भाऊ यांनी कायद्याचे उल्लंघन करत गुन्हेगारी वाढवली आहे. अश्या सर्वांनी मी आहे तो प्रयत्न दुसरा उद्योग बघावा, अन्यथा मी आहेच अश्या कडक शब्दात गुन्हेगारांना पहिल्याच दिवशी नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ‘पोलीसी डोस’ दिला आहे. तसेच सर्व सामान्यांसाठी मी 24 तास उपलब्ध असून नागरिकांनी मला मेसेज करावा असे आवाहन कृष्ण प्रकाश यांनी केले आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरात ‘झिरो टॉलरन्स’ कार्यपद्धत राबविणार येणार असल्याचेही सांगितले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या आयुक्‍त पदाचा पदभार त्यांनी संदीप बिष्णोई यांच्याकडून शनिवारी स्वीकारला. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. कृष्णप्रकाश म्हणाले की, पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी असून, यामध्ये आयटी, एज्युकेशन हब आहेत. या सुनियोजित शहरात कामगारांची संख्या अधिक आहे. सर्व घटकांचे प्रश्‍न वेगवेगळे आहेत.

शहरात माथाडी दादा, व्हाईट कॉलर दादा, लँड माफिया असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र शहरात यापुढे यांचे धंदे चालणार नाही.जे कायद्यात बसते ते जरूर करावे, कायदा मोडणाऱ्याची पोलीस कंबर मोडतील अश्या स्पष्ट शब्दांत गुन्हेगारांना संदेश दिला आहे. माझ्या पगारात मी समाधानी आहे, माझी कुठेही बदली केली तरी माझा पगार तेवढाच राहणार आहे असे कार्यकाळ पूर्ण न होता होणाऱ्या बदल्यांच्या प्रश्नांवर त्यांनी उत्तर दिले.

शहरातील व्हाईट कॉलर गुन्हेगारांनी त्यांना शुभेच्छा सोशल मीडियावर दिल्या यावर बोलताना ते म्हणाले अश्या सर्वांचा अभ्यास केला जाईल. मी ज्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणचा पहिला मी पूर्ण अभ्यास करतो. त्यामुळे मला दोन दिवस द्या, मला अभ्यास करू द्या, माझ्या सर्व अधिकाऱ्यांशी ‘वन टू वन’ बोलू द्या, त्यांच्या समस्या जाणून घेऊन द्या. मग मी दोन दिवसानंतर शहर साफ करण्याचे माझे काम सुरु करतो, असे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

सामाजिक संस्थाच्या माध्यमातून विविध घटकांच्या समस्या सोडविण्यावर माझाभर असणार आहे. अल्पवयीन गुन्हेगारी रोखून, भरकटलेल्या मुलांना योग्य दिशा देण्यासाठी माझे प्रयत्न असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले…..⭕

anews Banner

Leave A Comment