Home गडचिरोली गडचिरोलीच्या प्रश्नांवर विधान परिषदेत चर्चा धान खरेदी, कृषी गोदाम आणि जंगलावरील उद्योग...

गडचिरोलीच्या प्रश्नांवर विधान परिषदेत चर्चा धान खरेदी, कृषी गोदाम आणि जंगलावरील उद्योग सुरू करा

100

आशाताई बच्छाव

IMG-20221229-WA0024.jpg

 

गडचिरोलीच्या प्रश्नांवर विधान परिषदेत चर्चा

धान खरेदी, कृषी गोदाम आणि जंगलावरील उद्योग सुरू करा

शेकापचे आमदार भाई जयंत पाटील यांची मागणी

गडचिरोली ( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क ) : गडचिरोली हा जंगल व्याप्त जिल्हा असल्याने येथील बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी जंगलांचे रक्षण करुन त्यावर आधारित उद्योग शासनाने सुरू करावेत. त्यासाठी भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी केली.

आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनुशेषावरील २६० नियमान्वये चर्चेदरम्यान आमदार भाई जयंत पाटील म्हणाले, पुर्व विदर्भात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र धान खरेदी केंद्रे वेळेत सुरू होत नाही. साठवणुकीची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने शासनाच्या पैशांनी खरेदी केलेले धान्य सडून कोट्यवधींचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात मुबलक प्रमाणात धान साठवणूक गोदामांचे बांधकाम करण्याची आवश्यकता असून शासनाने निधी उपलब्ध करून द्यावे.

जंगलावर आधारित ब्रिकेटींग उद्योग सुरू करण्यासाठीही शासनाने पुढाकार घेण्याची मागणीही आमदार भाई जयंत पाटील यांनी केली.

Previous articleदेवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सुलभा आहेर तर उपनगराध्यक्षपदी अशोक आहेर यांची बिनविरोध निवड
Next articleसंभाव्य कोविड लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज -डॉ. राहुल गिते
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.