Home परभणी संभाव्य कोविड लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज -डॉ. राहुल गिते

संभाव्य कोविड लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज -डॉ. राहुल गिते

66
0

आशाताई बच्छाव

IMG-20221228-WA0022.jpg

संभाव्य कोविड लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज
-डॉ. राहुल गिते
नव्या व्हेरियंटचा सामना करण्यासाठी यंत्रणेची पूर्वतयारी
• नागरिकांनी प्रतिबंधात्मक लस घेण्यावर भर द्यावा

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)

परभणी,  (जिमाका): कोविड19च्या नव्या व्हेरियंटचे देशात संशयित रुग्ण सापडले असून, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्याचा यशस्वी सामना करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची पूर्वतयारी झाली असल्याची माहिती मॉकड्रीलचे नोडल अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी आज पत्रकार परिषदेत येथे दिली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जयश्री यादव, डॉ. वाघमारे, डॉ. संजय म्हस्के आदी यावेळी उपस्थित होते.
कोविडच्या संभाव्य लाटेचा यशस्वी सामना करण्यासाठी आज जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या अधिका-यांनी कोविड डेडिकेटेड रुग्णालयांच्या पूर्वतयारीची पाहणी करुन उपाययोजनांचा आढावा घेतला. परभणी शहरातील कल्याण मंडप्म, लाईफ लाईन हॉस्िरीचटल, स्वातती क्रिटीकेअर हॉस्िण कटल व सूर्या हॉस्िी टल येथे कोव्हिड केअर सेंटर उभारण्यांत आल्यााची माहिती डॉ. गिते यांनी दिली.
कल्या्ण मंडपम् येथील कोविड केअर सेंटर येथे 300 बेडची व्यवस्था असून सद्यस्थितीत 50 बेड कार्यरत ठेवण्यात आले आहेत. येथे वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचा-यांचीही व्यवस्थास करण्या0त आली असून ऑक्सिजन प्लाँटसह वैद्यकीय तसेच अग्निसुरक्षा यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेतला. जिल्हा आरोग्य यंत्रणेची कोविडशी लढण्याची तयारी असली तरीही नागरिकांनी कोविड लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. लसीकरण हाच त्यावरील एकमेव उपाय असून, जिल्ह्यात सध्या 37 हजार को-व्हॅक्सिन लस साठा असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.
कोविडबाबत कोणीही गाफील राहु नये. कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, तसेच कोविडची लक्षणे आढळून आल्यास न घाबरता त्यांनी तात्काळ आपली कोविड तपासणी करून घ्यावी. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांवर कोविड तपासणी सुरु आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल लवकरच जिल्ह्यातील ऑक्सिजन सिलेंडर पुरवठादारांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. ऑक्सिजन बेड, आयसीयुबेड, ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटीलेटर आदीबाबत आढावा घेतला जाणार असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.
जिल्ह्यातील 14 वैद्यकीय संस्था कोविडवर उपचार करण्यासाठी निश्चित केल्या असून, ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंटवर भर देण्यात येणार आहे. कोविडशी लढण्यासाठी सध्या आरोग्य यंत्रणेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असून, कोविड डेडीकेटेड 103 डॉक्टर व 197 परिचारिका आणि 105 पॅरामेडीकल कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार त्यात वाढ करण्यात येईल. सध्या जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे रॅपीड आणि आरटीपीसीआरच्या पुरेशा तपासणी किट असून, भविष्‌यात त्या वाढवाव्या लागल्यास तशी वाढ करता येणार असल्याचेही नोडल अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गिते यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोविड लसीकरण, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन सिलेंडर, लसींचा साठा, आयसीयु बेड, ऑक्सिजन बेडबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप यांनीही यावेळी माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here