Home नांदेड मुखेड कंधार विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय डाॅ.तुषारजी राठोड साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त...

मुखेड कंधार विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय डाॅ.तुषारजी राठोड साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त हेमंत बंडेप्पा खंकरे यांनी मुक्रमाबाद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन 

32
0

आशाताई बच्छाव

IMG-20221227-WA0023.jpg

मुखेड कंधार विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय डाॅ.तुषारजी राठोड साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त हेमंत बंडेप्पा खंकरे यांनी मुक्रमाबाद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुखेड प्रतिनीधी (बस्वराज स्वामी वंटगिरे युवा मराठा न्युज नेटवर्क)

मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार मा. डाॅ.तुषारजी गोविंदराव राठोड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ३ दिवसा पासून विवीध ठिकाणी सर्व परिसरातील गावांमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शाळेतील विद्यार्थ्यांना पॅड चे वाटप करण्यात आले.व आज मुक्रमाबाद येथील ग्राम पंचायत मैदानावर भव्य दिव्य असा कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.प्रा.गंगाधरजी राठोड साहेब व सभापती खुशाल पाटील उमरदरीकर यांच्या हस्ते करण्यात आले.कुस्ती साठि विविध जिल्ह्यांतील पैलवान हाजेरी लावली होती.कुस्ती बघण्यासाठी हाजारो जनसमुदाय गर्दी केली होती.बदोबस्त साठी मुक्रमाबाद पोलिस उपनिरीक्षक वाघमारे साहेब,आडेकर साहेब, पठाण सर,यांनी चोख बंदोबस्त ठेवली होती. तसेच ग्राम पंचायत येथे ५० वर्षा वरील नागरिकांचे आरोग्य शिबीर हि घेण्यात आले.या शिबीराचे उद्घाटन सरपंच सौ.अंजीता ताई बालाजी बोधने यांच्या हस्ते करण्यात आले या शिबीर मध्ये 50 वर्षापुढील व्यक्ती चा हाडाचा त्रास संदर्भातील BDM तपासणी मोफत करण्यात आले. यावेळी शिबीरातील तज्ञ डॉ.पवन राजुरकर स्वामी (अस्थिरोग तज्ज्ञ) डाॅ.आमोल कलेटवाड,डाॅ.सौ.माया मैदेपवाड,डाॅ.प्रमोद मस्के,डाॅ.राजेश सुर्य,डाॅ.सुरेश तिवारी,उदयगीरी लाॅयन्स नेत्र रुग्नालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजक ग्रा.प.सदस्य तथा भाजपा मुखेड तालुका सरचिटणीस हेमंत बंडेप्पा खंकरे व ग्राम पंचायत सदस्य सय्यद जलालोध्दीन,ग्रा.प.सदस्य धोंडीबा घंटेलवाड,व सर्व भाजपा सदस्य नागनाथ पारसेवार, विजयकुमार स्वामी, अविनाश पाटील,आनंदराव गोजगावे,सय्यद बाबा, दादाराव गुमडे, जयपाल दापकेकर, प्रकाश पंदीलवार, शेख मनान शरीफ, पांडुरंग पाटील, रमेश देवराव राठोड,यांनी परीश्रम घेतला.

Previous articleसंभाव्य कोविड लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज -डॉ. राहुल गिते
Next articleपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन..!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here