Home सोलापूर तुळशी वृंदावन भाविकांसाठी चालू करावे – ग्राहक पंचायतीची मागणी

तुळशी वृंदावन भाविकांसाठी चालू करावे – ग्राहक पंचायतीची मागणी

165

आशाताई बच्छाव

IMG_20231124_063055.jpg

तुळशी वृंदावन भाविकांसाठी चालू करावे – ग्राहक पंचायतीची मागणी

सोलापूर जिल्हा Berochip ज्ञानेश्वर निकम युवा (मराठा न्यूज नेटवर्क)

पंढरपूर- तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील बंद असलेले तुळशी वृंदावन भाविकांना पाहण्यासाठी लवकरात लवकर खुले करावे अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी, पंढरपूर यांच्याकडे केली असल्याची माहिती जिल्हाअध्यक्ष शशिकांत यांनी दिली. तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील येणाऱ्या भाविकांना, नागरिकांना पाण्यासाठी पर्यटन स्थळ म्हणून वन विभागाने तुळशी वृंदावनाची निर्मिती केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील विविध संतांची मंदिरे, श्री विठ्ठलाला प्रिय असणाऱ्या विविध प्रकारच्या तुळशीचे लागवड, इतर फुलझाडे, तसेच संतांची चित्रे त्यांच्या कार्याची सविस्तर ओळख माहिती सर्वांना हवी त्याचबरोबर कारंजे, म्युझिक लाईट, त्याच परिसरात असलेल्या यमाय तलाव अशा प्रकारे भाविकांना आनंद मिळवण्यासाठी येथे प्रयत्न केले आहेत. मात्र काही महिन्यापूर्वी त्यातील काही मंदिरांची पडझड झाल्याने विकसित केलेले हे तुळशी वृंदावन मागील सहा महिन्यापासून बंद आहे. याबाबत वन विभागाकडे संपर्क साधला असतात तुळशी वृंदावन केव्हा सुरू होईल याबद्दलची निश्चित माहिती मिळू शकली नाही. फक्त सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दुरुस्तीचे काम चालू असल्याचे समजले. सध्या कार्तिक यात्रेसाठी विविध मार्गावरून भाविकांनी पंढरपूरसाठी प्रस्थान केलेले आहे. त्यामुळे पंढरपूर मध्ये भाविकांची गर्दी होत आहे. आलेल्या भाविक दर्शन घेऊन तुळशी वृंदावन पाण्यासाठी परी वर असे येथे जात आहे प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यानंतर तुळशी वृंदावन दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले आहे असा फलक पाहवयास मिळतो. सोबत असलेले लहान मुले महिला यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यासाठी वन विभागाने तातडीने भाविकांसाठी तुळशी वृंदावन खुल्या करण्यात यावे. याबद्दलची वृत्तपत्रात प्रसिद्धी देऊन ही माहिती जनतेपर्यंत, भाविकांपर्यंत पोहोचवावी अशी मागणी प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, जिल्हा संघटक दीपक इरकल, जिल्हा सचिव सुहास निकते तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे केली आहे.

Previous articleदेगलूर महावितरण कार्यालयातील भोंगळ कारभार संदर्भात तक्रार दाखल.
Next articleउपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिराला भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.