Home नांदेड देगलूर महावितरण कार्यालयातील भोंगळ कारभार संदर्भात तक्रार दाखल.

देगलूर महावितरण कार्यालयातील भोंगळ कारभार संदर्भात तक्रार दाखल.

316
0

आशाताई बच्छाव

IMG_20231124_062641.jpg

देगलूर महावितरण कार्यालयातील भोंगळ कारभार संदर्भात तक्रार दाखल.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

महावितरण विभागाला ओबीसी फाऊंडेशन इंडिया चा २४० व्होल्ट चा झटका…
समाजसेवक तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी फांऊडेशन इंडिया चे धनाजीराव जोशी यांनी महावितरण विभागाला चांगलेच धारेवर धरले असून महावितरण विभाग चांगलेच दणाणून सोडले… सविस्तर बातमी अशी कि, उपजिल्हा देगलुर शहरातील महावितरण विभागाचे बेजबाबदार पणा ताठमानेने दिसत आहेत. दिवसागणिक महागाई चे झळ हे सामान्य मध्यमवर्गीय गोरगरीब जनता सोसत असुन त्यात महावितरण विभागाने नुकतेच परवा जाहीर केलेल्या स्मार्ट प्रिपेड मिटर बसवणे व खाजगी कंपन्यांकडून स्मार्ट प्रिपेड मिटर खरेदी करण्याचा व बसवण्याचा कंत्राट घेत असुन हे खेदणीय बाब आहे. या बातमी चा ही थेट जनतेतून विरोध होत आहे. जनतेला येणाऱ्या विज बिलात विविध टॅक्स लादणे हे आकारणी ते आकारणी अवाच्या सव्वा पैसे वसुल करत आहेत.
एकीकडे स्मार्ट सिटी… स्मार्ट वर्क… स्मार्ट कल्चर… म्हणत महावितरण कार्यालयातील भोंगळ कारभाराकडे कोणाचे लक्ष नसुन मनमानी कारभारामुळे सामान्य जनतेला मात्र न्याय मिळत नाही व नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आणि शहरातील बोटावर मोजण्याइतपत लोकच सुशिक्षित आहेत त्यातही सुशिक्षित बेरोजगार लोकांची संख्या जास्त आहे. त्यांच्या हाताला कोणते काम नाही व बरेच गोरगरीब शेतकरी कष्टकरी ईतर मागासवर्ग प्रवर्गातील लोक अशिक्षित व बेकार आहेत. आपल्या देगलूर शहरातील जवळपास १०० गावांचा संपर्क असुन शेतकरी प्रवर्गातील मध्यमवर्गीय कुटुंबातील सामान्य लोक राहतात, काहींना तर वाचता लिहीता हि येत नाही. असे सामान्य लोक आणि याच लोकांतून काही लोकांना विजबिल भरणा करून सुद्धा भरलेले बिल थकबाकी स्वरुपात परत बिल देत आहेत. काही ठिकाणी तर वीज न वापरता देखील हजारो च्या पट्टीत बिल येत असुन ग्राहक चौकशीसाठी आल्यास त्याला व्यवस्थित उत्तर न देणे, उडवाउडवीची उत्तरे देणे, वाद निर्माण होणे, वीज पुरवठा खंडित करणे, असे प्रकार समोर येत आहेत. व ग्राहक तक्रार निवारण होत नाही. ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे…
व काही ठिकाणी अनुचित प्रकार घडला तर जबाबदार कोण… जसे की, शार्ट सर्किट होणे, कोण्या व्यक्तिला शाक लागला असेल, वायर तुटून रस्त्यावर पडलेले दिसणे, तारांजवळ जाळ होणे ई. काही घटना घडल्यास संपर्क म्हणून महावितरण विभागाने दिलेले संपर्क क्रमांक ९१७८७५५८००६० हे फक्त कार्यालयाच्या बोर्डावर लिहण्या इतपत असुन त्याचा काही उपयोग सामान्य जनतेला होत नाही. आणि अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपर्क साधला असता रींगबेल जाऊन देखील तासन्तास फोन उचलतच नाहीत आणि कर्मचारी हे काल डायव्हर्ट करुन ठेवतात तर कधी कधी फोनद्वारे संपर्क च होत नाही हे वारंवार निदर्शनास आले असुन कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या व्यक्ती साठी महावितरण कार्यालय तर अक्षरशः जनु एक धर्म शाळेसारखे असुन तिथे आयाराम गयाराम’ चालु आहे. तिथे कोणी वाली नसुन संपर्क साधाण्यासाठी ना कर्मचारी ना अधिकारी ना तक्रार नोंद वही…??? तक्रार विभागात कोणीही कर्मचारी नसुन कुठे गेलेत हे विचारले असता तर कोणी बोलतच नाही आपापल्या मोबाईल मध्ये गुंग आणि कोणी बोललेच तर… माहीत नाही, असतील पहा, थोडासा वेळ येई पर्यंत बसा, तक्रार वहीत तक्रार नोंदवायचे आहे म्हणून तक्रार विभागाकडे गेल्यास तिथे हि अधिकारी कर्मचारी नाहीत. तक्रार वही देखील नसुन सामान्य जनतेला हेच कळत नाही की आपण तक्रार करावे तर कोणाकडे…??? असा प्रश्न सामान्यांना पडत असुन तक्रार विभागाच्या या सर्व गोष्टींना जबाबदार कोण… आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे व समस्या सोडविण्यासाठी जबाबदार व्यक्ती कोण असे प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडत आहे….??? कार्यालयात गेल्यावर तिथे कोणीही नसुन जुगार अड्डा बनला असुन अस्ताव्यस्त पडलेले पत्ते, चटई, उशी. पत्यांचा पाणाचा एक प्रकारे वर्षाव म्हटल तरी चालेल असे जुगार अड्डा बनला आहे धुम्रपान विषजन्य पानमसाला तंबाखु बिडी सिगरेट गुटखा ई. ने दुर्गंध सुटत आहेत. तेथे नागरिकांच्या संरक्षणाकरीता सिगारेट, तंबाखू व तंबाखूजन्य इतर उत्पादने प्रतिबंधक कायदा २००३ च्या कलम-४ अन्वये तंबाखू खाणे/युांकणे/ धूमपान करण्यास प्रतिबंध आहे. शासकीय इमारतीच्या परिसरामध्ये धूमपान आणि थुंकणे हा दंडात्मक गुन्हा आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायदा २००३ च्या कलम ४ प्रमाणे जे व्यक्ती तंबाखूचे सेवन करत नाही अशा व्यक्तींना जे व्यक्ती धुमपान व तंबाखूचे सेवन करतात त्यांच्या पासून संरक्षण करण्याकरीता शासकीय कार्यालये/ निमशासकीय कार्यालये/ कार्यालयाचा परिसर / उपहार गृहे इत्यादी सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणे / धुमपान करणे / धुंकणे हे प्रतिबंधीत करण्यात आले आहे. असे असुन सुद्धा महावितरण विभागात अश्या प्रकारचे वागणूक धुम्रपान सारखे धंदे बिंदास चालू आहेत. या सर्व बेकायदेशीर गोष्टींना तात्काळ आळा घालण्यासाठी पाऊले उचलण्यात यावे व दोषी व्यक्ती वर कायदेशीर कारवाई करण्यात यावे. सर्व लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच कार्यालये स्वच्छ ठेवण्याकरीता ‘स्वच्छ भारत स्वस्थ भारत’ या अभियानाचा एक भाग म्हणून सर्व शासकीय कार्यालये/ निमशासकीय कार्यालये/ कार्यालयाचा परिसर / उपहार गृहे इत्यादी सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणे / धुमपान करणे / भुंकणे इत्यादींसाठी प्रतिबंधीत आहे व हा कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे आपल्या कार्यालयात या गोष्टींवर प्रतिबंध करण्यात यावा.
यासाठी आपल्या कार्यालयीनस्तरावरून मार्गदर्शक सुचना काढाव्यात तसेच आपले व आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालये, तंबाखू गुटखा पानमसाला बिडी सिगरेट ई., धुम्रपान मुक्त परिसरात धुमपान करणे व गुटखा पानमसाला बिडी सिगरेट तंबाखू खाऊन भुंकणे हा दंडात्मक गुन्हा आहे असे घोषित करावे. तंबाखू मुक्त कार्यालये यासाठीच्या मार्गदर्शक सुचना मराठी अक्षरात फलकावर लावण्यात यावे. व शासकीय कार्यालये/ निमशासकीय कार्यालये/ कार्यालयाचा परिसरात जुगार पत्ते खेळणे व कार्यालयात पत्ते अस्ताव्यस्त पडलेले दिसत असुन कायद्याने गुन्हा आहे व त्यावर बंदी असुन देखील शासकीय कार्यालयात अश्या प्रकारच्या गुन्हयांना वाव देणे अशा गोष्टींकडे वरीष्ठ अधिकारी दुर्लक्ष करणे हेही एक प्रकारचा गुन्हा असुन या गोष्टींना वाव देणे व दूर्लक्ष करणाऱ्या महावितरण विभागातील कर्मचारी तसेच अधिकारी यांच्या वर शासन निर्णयानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावे… व हे सर्व बेकायदेशीर धंदे बंद करण्यात यावे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन उपकार्यकारी अभियंता अधिकारी, पवार साहेब व सहायक मुद्दासिर साहेब यांच्याशी यासर्व भोंगळ कारभार संदर्भात व सामान्य नागरीकांचे व ग्रामीण भागातील नागरिकांचे नवीन कनेक्शन मागणी ई. सर्व विषयावर सविस्तर चर्चा केल्यावर शेतकरी प्रवर्गातील व ग्रामीण भागातील व्यक्तींनी थ्री फेज व सिंगल फेज नियमानुसार ज्या व्यक्ती चे कोटेशन दिलेल आहे. ज्यांचे कोटेशन पुर्ण झालेल आहे त्यांना नवीन कनेक्शन देण्यात येईल व ज्या ठिकाणी विद्युत खांब व वायर वोडणे किंवा अंतर जास्तीचे असेल किंवा कोटेशन एकच व्यक्ती भरला असेल तिथे ईतर कोणी ही कोटेशन भरला नसेल तर अशा व्यक्ती साठी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महावितरण विभागाने पर्यायी म्हणून सोलार खांब लाईट उपलब्ध करून देऊ तातडीने काम पुर्ण करुन देऊ महावितरण विभागाने अश्या प्रकारचे व्यवहार ईथे चालू देणार नसुन एक शिष्टमंडळ नेमून बैठक घेऊन त्यांच्याशी या सर्व विषयावर सविस्तर चर्चा करुन बेकायदेशीर गोष्टींना तात्काळ आळा घालून योग्य ते पाऊले उचलण्यात येतील व दोषी व्यक्ती वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यावर या सर्व बाबी लवकरात लवकर सोडुन द्यावे, व शासन नियमानुसार कायदेशीर रीत्या कारवाई करण्यात येईल तसेच तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. याची महावितरण विभागाने नोंद घ्यावी. अन्यथा गाठ धनाजीराव जोशीं सोबत आहे. असे स्वतः धनाजीराव जोशी यांनी कडक ताकीद महावितरण विभागाला दिले आहे.

Previous articleतुमसरात सत्यशोधक विवाह ठरला “प्रेरणादायी विवाह ” वर – वधू बुद्धिष्ट,विवाह मात्र सत्यशोधक पद्धतीने
Next articleतुळशी वृंदावन भाविकांसाठी चालू करावे – ग्राहक पंचायतीची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here