Home Breaking News 🛑 बुलढाणा *जिल्यात 7 जुलै ते 21 जुलै पर्यंत लॉक डाऊन ….!...

🛑 बुलढाणा *जिल्यात 7 जुलै ते 21 जुलै पर्यंत लॉक डाऊन ….! पालकमंत्र्यांची घोषणा*🛑 ✍️ बुलढाणा :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

81
0

🛑 बुलढाणा *जिल्यात 7 जुलै ते 21 जुलै पर्यंत लॉक डाऊन ….! पालकमंत्र्यांची घोषणा*🛑
✍️ बुलढाणा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

बुलढाणा :⭕कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याचा अंदाज नुकताच गुड इव्हिनिंग सिटीने वर्तवला होता..तो अंदाज तंतोतंत खरा ठरला असून जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उद्यापासून संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात लॉक डाऊन लागू करण्याची घोषणा केली आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आज येथील जिल्हा नियोजन सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यात पालकमंत्र्यांनी संपूर्ण जिल्ह्यात लॉक डाऊन लागू करण्याची घोषणा केली आहे.
लॉक डाऊन दरम्यान दरम्यान’ सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत दुकानांना परवानगी राहील.इतर वेळेस कडक कर्फ्यु असणार असल्याची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी दिली

*पत्र परिषदेतील ठळक मुद्दे*
बुलडाणा येथे स्वाब टेस्टिंग प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच 10 जणांचा स्टाफ लागणार… हा प्रस्ताव ताबडतोब राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
आमदारांना रॅपिड अँटीजन टेस्ट किटसाठी 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे… आपल्याला 15 हजार किट किमान लागतील.

सोशल डिस्टनसिंग पाळली जात नाही, मास्क लावले जात नाहीत.🛑

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here