• Home
  • 🛑 गुड न्यूज..! महाराष्ट्रातील नव्या कोरोनाग्रस्तांच्या संखेत मोठी घट 🛑 ✍️मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 गुड न्यूज..! महाराष्ट्रातील नव्या कोरोनाग्रस्तांच्या संखेत मोठी घट 🛑 ✍️मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 गुड न्यूज..! महाराष्ट्रातील नव्या कोरोनाग्रस्तांच्या संखेत मोठी घट 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ गेल्या काही दिवसांपासून 6500 ते 7000 च्या आसपास कोरोनाचे नवीन रुग्ण सापडू लागल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आज या आकड्यामध्ये कमालीची घट नोंदविली गेली आहे. आज राज्यभरात 5,368 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले असून 204 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2,11,987 वर गेला असून एकूण मृत्यूंची संख्या 9,026 झाली आहे. राज्यात सध्या 87,681 रुग्ण उपचार घेत आहेत. बरे होण्याचा दर हा 54.37% झाला असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले. रविवारी राज्यामध्ये 6555 नवे रुग्ण सापडले होते. तर 151 जणांचा मृत्यू झाला होता. आज मृत्यूचा आकडा वाढला आहे. तर मृत्यूचा आकडा 8822 झाला होता. शनिवारी  7074 नवे रुग्ण सापडले होते.

यामुळे महाराष्ट्राने कोरोनाबाधितांचा २ लाखांचा आकडा ओलांडला होता. याच दिवशी 295 जणांचा मृत्यू झाला होता.  या तीन दिवसांच्या तुलनेत आज नवीन कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट पहायला मिळाली आहे. मात्र, मृत्यूंचा आकडा चिंतेचे वातावरण निर्माण करणारा आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी  समाजातील प्रत्येक घटक एकत्र येऊन जेव्हा संकटाशी मुकाबला करतात त्यावेळेस यश नक्की मिळते. आपण कोरोनाच्या लढाईत नक्कीच विजयी होऊ, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला….⭕

anews Banner

Leave A Comment