Home भंडारा तुमसरात सत्यशोधक विवाह ठरला “प्रेरणादायी विवाह ” वर – वधू बुद्धिष्ट,विवाह मात्र...

तुमसरात सत्यशोधक विवाह ठरला “प्रेरणादायी विवाह ” वर – वधू बुद्धिष्ट,विवाह मात्र सत्यशोधक पद्धतीने

72
0

आशाताई बच्छाव

IMG_20231124_062223.jpg

तुमसरात सत्यशोधक विवाह ठरला “प्रेरणादायी विवाह ”

वर – वधू बुद्धिष्ट,विवाह मात्र सत्यशोधक पद्धतीने

(विवेक बोरकर आणि अधिक्षा सिंगाडे यांनी रचला नवा पायंडा)

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )विवेक बोरकर आणि अधिक्षा सिंगाडे या नवदाम्पत्याने “सत्यशोधक विवाह” पद्धतीने विवेकी सहजीवनाची सुरवात तुमसर येथिल शकुंतला सभागृहात केली.वर आणि वधू दोन्हीं बुधिध्ट असताना सुद्धा परंपरेला छेद देत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलेल्या सत्यशोधक विवाह पद्धतीचा अंगीकार केला.तेव्हा हा विषय इतरांसाठी प्रेरणादायी ठरला.शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर चे मुख्याध्यापक तथा प्रबोधनकार राहुल डोंगरे यांनी “झाले शुभमंगल झाले,आज हे शुभमंगल झाले” हया सत्यशोधक मंगल अक्षता सादर करून हा सत्यशोधक विवाह पार पाडला. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध,राष्ट्रमाता जिजाऊ,जगतगुरु तुकोबाराय,रयतेचे राजे शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,क्रांतिज्योती सावित्रीआई फुले,राजर्षी शाहू महाराज,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर,भारतीयांची आई ‘ रमाई ‘ या महामानवांना वर – वधू आणि दोन्हीं कुटुंबियांच्या पालकांनी अभिवादन केले. सत्यशोधक विवाह संपन्न झाल्यानंतर उभयत्यांना प्रबोधनकार राहुल डोंगरे यांनी शपथ दिली.जोडीने समाजाचे,देशाचे, माता पित्याचे ऋण फेडू अशी शपथ घेतली, हे विशेष!
भारतीय समाजात विवाह किंवा लग्न ही जीवनातील महत्वाची घटना समजली जाते.याच भावनेला धार्मिक आशय देवून त्यावर तसे कर्मकांड,रीती रिवाज, जातीव्यवस्थेचे, धर्मव्यवस्थे चे व एकूणच संस्कृतीची परिघे चढविली जातात.याला क्रांतीसुर्य महात्मा फुल्यांनी छेद दिला.महात्मा फुले यांनी स्त्रिशुद्रातिशुद्रांच्या या धार्मिक प्रथेचा सखोल अभ्यास केला.पुरोहितांनी थोतांड कर्मकांड सांगून स्वतःची पोट नेहमीच भरली आहेत व त्यांची सत्ता वर्चस्व बहुजनांच्या मनात ठसविले,ही पार्श्वभूमीवर भारतीय विवाह संस्थेच्या मुळाशी आहे.पैश्याची बचत,स्त्री – पुरुष समनाता,सत्य,प्रेम,नम्रता, धर्मनिरपेक्षता,अंहिसा,आत्मनिर्भरता, एकनिष्ठा, समता ही सहजीवनाची मूल्ये या सत्यशोधक विवाहातून रुजविण्यात येतात असे प्रतिपादन समाजप्रबोधक राहुल डोंगरे यांनी केले.यास्तव हा विवाह सोहळा प्रेरणादायी व चर्चेचा विषय ठरला आहे.
याप्रसंगी “समतेच्या वाटेने” या गीताने वरवधुचे सोबतच विवाह मंचावर आगमन झाले.प्रकाश चव्हाण यांनी डफ वाजवून आणि आकाश मेश्राम,यश सोमकुवर,पंकज सोमकुवर,आशिष वासनिक,रितेश सरजारे यांनी”समतेच्या वाटेने “हे गीत सादर करून उपस्थित पाहुण्याची मने जिंकली.

Previous articleमॉयल ची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना ठरली पांढरा हत्ती
Next articleदेगलूर महावितरण कार्यालयातील भोंगळ कारभार संदर्भात तक्रार दाखल.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here