Home भंडारा मॉयल ची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना ठरली पांढरा हत्ती

मॉयल ची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना ठरली पांढरा हत्ती

77
0

आशाताई बच्छाव

IMG_20231124_061827.jpg

मॉयल ची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना ठरली पांढरा हत्ती

नदी पात्रात खोदलेल्या विहिरींना पाणीच नाही

सि एस आर निधी चा दुरुपयोग

सदर निधी गोबरवाही प्रादेशिक नळ योजनेवर खर्च करण्याची गरज

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) तुमसर तालुक्यातील चिखला खान (मॉयल) अंतर्गत सी एस आर फंडातून कोट्यवधी रुपये खर्च करून बावनथडी नदीपात्रात मॉयल ची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना तयार करण्यात येत आहे. मात्र त्या योजने साठी तयार करण्यात आलेल्या विहिरी कोरड्याच असल्यामुळे मॉयलची ती योजना पांढरा हत्ती ठरला असून येथे सी एस आर निधीचा सर्रास दूरउपयोग केला जात आहे.
एशिया खंडात प्रसिद्ध तुमसर तालुक्यात डोंगरी बुज. व चिखला येथे दोन मॅग्नीजच्या खानी (मॉयल) आहेत. चिखला मॉयल ला गत ४० वर्षापासुन ते आतापर्यंत गोबरवाही प्रादेशिक नळ योजना अंतर्गत पाणी पुरवठा केला जात आहे . मात्र मॉयल च्या अधिकाऱ्यांनी नवीन शक्कल लढवून सी एस आर निधी अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा चा दूर उपयोग केला आहे. वास्तविक रित्या मॉयलने एवढा निधी खर्च न करता जर गोबरवाही प्रादेशिक नळ योजनेवर खर्च केले असते तर ती योजना आणखी चांगली सुरळीतपणे सुरू असती व आहे . मॉयल ला गोबरवाही प्रादेशिक नळ योजने अंतर्गत पाणी पुरवठा होत आहे व आजही पाणी पुरवठा सुरूच आहे. मग मॉयल ला एवढा निधी खर्च करण्याची गरज का भासली हे न समजणारे कोडे आहे. जर सी एस आर निधी खर्च करायचेच होते तर बावनथडीच्या धरणावर 23 गावांकरीता शासकीय योजने अंतर्गत 19 करोड रूपये खर्च करून वॉटर फिल्टर आलेसुर इथे तयार
करण्यात आले आहे. परंतु ते 20 वर्षापासुन बंद होते. दरम्यान तत्कालीन सरकारने मागील वर्षात पाणी
टंचाई अंतर्गत 4.50 कोटी मंजुर करून त्या वॉटर फिल्टर वर काम केले परिणामी काही गावांना पाणी आता पाणी मिळणे सुरू झाले आहे मात्र अजून हि काही गावे पाण्यापासून वंचितच आहेत. त्यात ही जिल्हा परिषद व पाणी पुरवठा प्राधिकरण या मध्ये ही योजना कोण चालवेल यासाठी वाद सुरू आहे .मॉयल ने बावनथडी नदी पात्रात पाणी पुरवठा ची स्वतंत्र योजना
तयार न करता मॉयल च्या सी एस आर फंडातून आलेसुर येथे तयार असलेली वॉटर फिल्टर योजनेवर स्वतंत्र हाताळणी करून चालवायला पाहिजे होती. जेणेकरून या 23 गावांना शुध्द पाणी मिळाले असते व सी एस आर निधिचा सर्व गावांना लाभ मिळाला असता. मात्र मॉयलने तसे न बावनथडी नदी पात्रात एक प्रकारचा पांढरा हत्ती उभारला आहे.,
कोट:–
मोठ्या उद्योगाने त्यांच्या नफ्यातून सामाजिक परिवर्तनाचा वाटाही उचलावा यासाठी सी एस आर म्हणजेच सोशल रिस्सिपाबिलिटी ही संकल्पना अस्तिवात आली.मात्र मॉयलची कसल्याही प्रकारची आजुबाजुच्या गावांना मदत होत नाही. या कडे जनप्रतिनिधिने आर्वाजुन लक्ष दयावे. अन्यथा आम्हाला आंदोलनाचे हत्यार उगरावे लागेल.
ठाकचंद मुंगूसमारे
जिल्हा अध्यक्ष रायुका (शरद पवार गट)

Previous articleपत्रकार कुलदीप गंधे यांच्या वाढदिवस साजरा
Next articleतुमसरात सत्यशोधक विवाह ठरला “प्रेरणादायी विवाह ” वर – वधू बुद्धिष्ट,विवाह मात्र सत्यशोधक पद्धतीने
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here