Home नाशिक दावचवाडीला योगेश्वर विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा संपन्न—

दावचवाडीला योगेश्वर विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा संपन्न—

712
0

आशाताई बच्छाव

IMG-20230630-WA0037.jpg

दावचवाडीला योगेश्वर विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा संपन्न—

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

दावचवाडी तालुका निफाड येथील योगेश्वर विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त दिंडी, रिंगण, भजन, फुगडी, वारी मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यानिमित्ताने संस्थेचे विश्वस्त प्रभाकर कुयटे, मुख्याध्यापक बाळासाहेब सोनवणे, स्कूल कमिटी सदस्य रमेश शिंदे, बाबाजी शिरसाठ, शिलाताई अहिरे, सुखदेव आगळे, गोरख कुयटे, बाबुराव धुमाळ,दिनकर कुयटे, अर्जुन कुयटे,गणपत कुयटे, बाळासाहेब धुमाळ, दादाजी शिंदे,प्रभाकर शिंदे,बापूशेठ कोचर, बाळासाहेब गायकवाड, बबनराव कुयटे, विठोबा शिरसाठ सरपंच अशोक धुमाळ आदी मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करून महाआरती करण्यात आली. ही वारकरी दिंडी दावचवाडी गावातून काढण्यात आली.याप्रसंगी गायकवाड काका तसेच तनुजा कुयटे, श्रद्धा धुमाळ, सिद्धी आगळे, तनुजा आहेर व भजनी मंडळ यांनी एकादशी निमित्ताने पारंपरिक संतांचे अभंग, गवळणी, व भक्तीगीतांचे सादरीकरण केले. तसेच विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी फुगडी, रिंगण दिंडीत सहभागी होऊन आनंद लुटला.
वारीच्या निमित्ताने पर्यावरणाचे महत्त्व सांगणाऱ्या वृक्षदिंडी चे आयोजन करून झाडे लावा झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जिरवा, हा संदेश देण्यात आला.
वारकरी संप्रदायाची प्रेरणा हे विद्यार्थ्यांच्या यशासाठी उपयुक्त असल्याने असे नाविन्यपूर्ण उपक्रम प्रत्येक विद्यालयाने राबवणे आवश्यक आहे असे मनोगत विश्वस्त प्रभाकर कुयटे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाचे संस्कार रुजावे यासाठी विद्यालयाने वारीचे आयोजन केल्याने सुखदेव आगळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमानंतर प्रसाद वाटप करण्यात आला.
विद्यालयाने वारीचे आयोजन केल्यामुळे गावात हरीनामच्या गजराने आनंददायी व सात्त्विक वातावरण निर्माण झाल्याने भाविकांनी व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला,

Previous articleलासलगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराला वर्दी पाठक यांनी दिले संपुर्ण भजन साहित्य भेट–
Next articleभाजप महिला आघाडीच्या वतीने सोनापूर- कॉम्प्लेक्स वार्डात घर- घर चलो महा जनसंपर्क अभियान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here