Home Breaking News 🛑 सासुबाईनी अनोखा केला गौरी पुजन सोहळा….! दोन्ही सुनांना चक्क मखरात बसवून...

🛑 सासुबाईनी अनोखा केला गौरी पुजन सोहळा….! दोन्ही सुनांना चक्क मखरात बसवून केली पुजा 🛑

109
0

🛑 सासुबाईनी अनोखा केला गौरी पुजन सोहळा….! दोन्ही सुनांना चक्क मखरात बसवून केली पुजा 🛑
✍️वाशिम 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

वाशिम :⭕गौराईचा ( महालक्ष्मी) सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

वाशिम शहरातील सिंधुबाई सोनुने यांनी चक्क आपल्या दोन्ही सुनांचं गौरी म्हणून पूजन केलं…

यंदाही सिंधुबाईंनी मोठ्या उत्साहात चालत्या बोलत्या गौरींची स्थापना करून खरी लक्ष्मी ही सुनच असते, असा संदेश समाजाला दिला आहे.

सिंधुबाई सोनुने यांनी यावर्षी मंगळवारी आपल्या दोन्ही सुनांना ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी म्हणून मखरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं बसवत त्यांची पूजन करून उत्सव साजरा केला.

सिंधूबाई सोनुने यांनी जिवंत चालत्या बोलत्या गौरी (महालक्ष्मी) अशा प्रकारे सोहळा साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

हा अनोखा गौरी पूजन सोहळा पाहण्यासाठी नागरिक एकच गर्दी केली होती.

या गौरी सोहळ्यामधून सासू आणि सुनांमधील प्रेम, सलोखा आणि जिव्हाळा कायम राहावा, असा आपला उद्देश असल्याचं सिंधुबाई सोनुने यांनी सांगतलं आहे.

आमच्या सासूबाई आम्हा दोघींना प्रत्यक्ष गौरीचा मान देतात, याचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचं या दोन्ही सिंधुबाईंच्या दोन्ही सुनांनी सांगितलं आहे.⭕

Previous article*वडगांव शहरात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढला.*
Next article🛑 महेश मांजरेकर यांना ३५ कोटीच्या खंडणीसाठी धमकी देणारा निघाला…! “चहावाला” 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here