• Home
  • 🛑 *छावा प्रतिष्ठानकडून रत्नागिरीतील थिबा राजवाड्याची स्वच्छता*🛑

🛑 *छावा प्रतिष्ठानकडून रत्नागिरीतील थिबा राजवाड्याची स्वच्छता*🛑

🛑 *छावा प्रतिष्ठानकडून रत्नागिरीतील थिबा राजवाड्याची स्वच्छता*🛑
✍️रत्नागिरी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी:⭕ ( दिनांक ०४.१०.२०२० वार रविवार )
रत्नागिरी येथील थिबा राजवाड्याची स्वच्छता रत्नागिरीच्या सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणाऱ्या छावा प्रतिष्ठानने केली.सध्या सर्वत्र करोनाचा प्रादुर्भाव आहे. त्याचा दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी सर्व कामे थांबली आहेत. या सर्व बाबींचा विचार करून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतिष्ठित संस्था छावा प्रतिष्ठानने रत्नागिरीतील थिबा राजवाडा या ऐतिहासिक वास्तूची स्वच्छता केली.

सध्या शासनाने लॉकडाउनचे नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे योग्य ते नियम पाळून छावा प्रतिष्ठानने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. रविवारी सकाळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल धावडे आणि कार्यध्यक्ष श्री.संतोष आग्रे यांच्या पुढाकाराने पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी श्री.शुभम भागवत यांच्या सहकार्याने अभियानास सुरुवात झाली.

त्यामध्ये या प्रतिष्ठानच्या सदस्यांनी लॉकडाउनच्या काळात वाढलेले गवत आणि झाडी काढणे अशी कामे केली.राजवाड्याच्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ करण्यात आला. अभियानाच्या सुरुवातीला पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी श्री.शुभम भागवत यांनी प्रतिष्ठानच्या सदस्यांचे स्वागत केले. स्वच्छता अभियान यशस्वी होण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.सुनिल धावडे,सचिव श्री.समीर गोताड,कार्याध्यक्ष श्री.संतोष आग्रे, खजिनदार श्री.गणेश कांबळे, प्रवक्ते श्री.संगम धावडे,संघटक श्री.समीर धावडे,प्रशांत कांबळे, निलेश कळंबटे,संदेश धावडे,मुकेश धावडे,दिनेश गार्डी यांनी मेहनत घेतली.त्याचप्रमाणे चाईल्ड लाईन या संस्थेच्या केंद्र समन्वय सौ.अन्वी शिंदे,ऋषिकेश शिवगण,अंकिता कळंबटे,अभिषेक भुते,अनुजा कारेकर यांनी सहकार्य केले…⭕

anews Banner

Leave A Comment