Home Breaking News ‌🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे शाळा बाहेरची शाळा 🛑

‌🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे शाळा बाहेरची शाळा 🛑

81
0

‌🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे शाळा बाहेरची शाळा 🛑
✍️रत्नागिरी:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

रत्नागिरी :⭕ *मार्च २०२० पासून सर्वत्र कोविड चा प्रादुर्भाव सुरु झाल्यामुळे सन २०२० -२१ चे शैक्षणिक वर्ष अद्याप सुरु झालेले नाही. शाळा कधी सुरु होतील याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.

यावर उपाययोजना म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. परंतू तांत्रिक अडचणी व आपल्या जिल्हाची भौतिक अवस्था यामुळे इंटरनेट सुविधा सर्व ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. म्हणून ऑनलाइन शिक्षणासाठी येणाऱ्या मर्यादा लक्षात घेता प्रथम संस्था व जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या “शाळेबाहेरील शाळा” उपक्रमात जि.प.शाळा नारशिंगे या शाळेतील शिक्षक श्री.जाजनुरे सर व श्री.दुधाळे सर त्यांचे अनमोल योगदान देतच आहेत तसेच एक व्यापक मोहीम राबविण्याच्या दृष्टीने सहभागी होण्याचे गावातील सुशिक्षित तरूणांना आवाहन केले होते .त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेच्या वतीने “शाळाबाहेरील शाळा” या उपक्रमाचा शुभारंभ दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी संपन्न झाला.या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रतिष्ठान तर्फे चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.

या उपक्रमासाठी प्रतिष्ठान तर्फे मुलांच्या मार्गदर्शनासाठी श्री.समीर गोताड,श्री.गणेश कांबळे, श्री.संगम धावडे,श्री.सुदीप पवार आणि निलेश कलंबटे यांची स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली.याप्रसंगी प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री.सुनिल धावडे,सचिव श्री.समीर गोताड,प्रवक्ता श्री.संगम धावडे,संघटक श्री.समीर धावडे,सदस्य श्री.निलेश कलंबटे,राहुल धावडे,विजय धावडे इत्यादी पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.*⭕

Previous article🛑 ‘शिवशाहु यात्रा ‘ काढणार :- संभाजीराजेंची घोषणा 🛑
Next article🛑 *छावा प्रतिष्ठानकडून रत्नागिरीतील थिबा राजवाड्याची स्वच्छता*🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here