• Home
  • सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अदनान पाशा सचिवपदी विजय लोहबंदे तर कार्याध्यक्ष गिरीधर पा.केरुरकर यांची नियुक्ती..

सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अदनान पाशा सचिवपदी विजय लोहबंदे तर कार्याध्यक्ष गिरीधर पा.केरुरकर यांची नियुक्ती..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210203-WA0070.jpg

सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अदनान पाशा
सचिवपदी विजय लोहबंदे तर कार्याध्यक्ष गिरीधर पा.केरुरकर यांची नियुक्ती..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार
रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक, कुलवाडीभुषण, छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त २०२१ साली आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अदनान पाशा नाजीमोद्दीन यांची तर सचिवपदी विजय लोहबंदे, कार्याध्यक्षपदी गिरीधर पाटील केरुरकर यांच्यासह समितीची सर्वानुमते निवड करण्यात आली.
संपूर्ण राज्याला आदर्श असावा अशी सर्वधर्म-जातीच्या नागरिकांना सोबत घेऊन शहरात अनेक वर्षापासून सार्वजनिक शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. यंदा २०२१ सालच्या शिवजन्मोत्सव समिती गठित करण्यासाठी छत्रपती शिवस्मारक येथे बैठक आयोजित करण्यात आली. याबैठकीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, जेष्ठ नेते सदाशिवराव पाटील जाधव, माजी उपनगराध्यक्ष गंगाधर पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गेडेवाड, ओबिसी नेते डाॅ.श्रावण रॅपनवाड, रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे, माजी उपनगराध्यक्ष प्र. रामदास पाटील, मनसे तालुकाध्यक्ष संतोष बनसोडे, राजमुद्रा अध्यक्ष सचिन पाटील, अबुल कलाम समिती अध्यक्ष एस.के.बबलु , किसान युवा क्रांती तालुकाध्यक्ष माधव पा.होनवडजकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती २०२१ च्या अध्यक्षपदी अदनान पाशा नाजिमोद्दीन तर सचिवपदी काॅ. विजय लोहबंदे कोषाध्यक्ष हर्षवर्धंन पाटील बेळीकर, कार्याध्यक्ष गिरीधर पाटील केरूरकर, उपाध्यक्ष दिनेश पा. केरूरकर, संतोष बनसोडे, योगेश मामीलवाड, सहसचिव अनिल सिरसे, अॅड. लक्ष्मण सोमवारे, शेख बबलू, प्रसिध्दीप्रमुख संदिप पिल्लेवाड, पवन जगडमवार , संघटकपदी काॅ. अंकुश माचेवाड, सहसंघटक योगेश पा.खंडगावकर, सदस्य गोपाळ पाटील बोरगावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

anews Banner

Leave A Comment