• Home
  • आदर्श विद्यार्थी दिनदर्शिका विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त

आदर्श विद्यार्थी दिनदर्शिका विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210203-WA0047.jpg

आदर्श विद्यार्थी दिनदर्शिका विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त
~~ हिरालाल सोनवणे

आदिवासी विकास आयुक्तालयात प्रकाशन

नाशिक ता. ३: (दिलीप चव्हाणब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-आदर्श विद्यार्थी दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांचे हस्ते करण्यात आले.
शिक्षक ध्येय प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेली ‘आदर्श विद्यार्थी दिनदर्शिका’ ही विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहितीने परिपूर्ण तसेच आकर्षक असून त्याची संकल्पना लक्षवेधी आहे असे उदगार आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी काढले.
नाशिक येथील आदिवासी विकास भवनातील आयुक्तांच्या दालनात प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
आदर्श विद्यार्थी दिनदर्शिकेत प्रत्येक पानावर आदर्श विद्यार्थी कसा असावा? याची व्याख्या, चित्रकोडे, गणित कोडे, शब्द कोडे, थोर नेत्यांचे फोटोसह विचार, उत्तम सुविचार, व्यायाम प्रकार, विविध पक्षांची चित्रे, दिनविशेष आदि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसमोर वर्गात लावण्यासाठी ही नाविन्यपूर्ण दिनदर्शिका राज्यभर वितरित केली जाणार आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या शिक्षक ध्येय मासिकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले.
प्रकाशन सोहळ्याप्रसंगी अपर आयुक्त (मुख्यालय) विकास पानसरे, उपायुक्त (शिक्षण) लोमेश सलामे, उपायुक्त (प्रशासन) अविनाश चव्हाण, सहा. प्रकल्प अधिकारी (शिक्षण) वर्षा सानप, सहा. प्रकल्प अधिकारी अनिता दाभाडे आणि शिक्षक ध्येयचे संपादक मधुकर घायदार उपस्थित होते.
राज्यस्तरीय शिक्षक ध्येयच्या संपादकीय मंडळात कार्यकारी संपादक प्रभाकर कोळसे (वर्धा); मुख्य सहा संपादक रमेश खरबस (अकोले); अतिथि संपादक सुधाकर जाधव (औरंगाबाद); सहायक संपादक डॉ. माधव गावीत (कळवण); अशरफ आंजर्लेकर (रत्नागिरी); खंडू मोरे (नाशिक); सह संपादक नितिन केवटे (नाशिक); अजय भालेराव (अहमदनगर); दिलीप वाघमारे (सांगली); सतेशकुमार माळवे (सातारा); उपसंपादिका अर्चना भरकाडे (यवतमाळ); कविता चौधरी (जळगाव); श्रद्धा पवार (पाचोरा); उषा कोष्टी (मंगळवेढा); प्रणाली कोल्हे (नागपूर); रंजना कोळी (जामनेर); अरुणा उदावंत (जळगाव); दीपाली बाभुळकर (अमरावती); मंजूषा खत्री (नाशिक); विद्या वालोकर (वर्धा); अंजली कडू (झापल); संध्या सावंत (मुंबई); डॉ. सुधीर अग्रवाल (नागपूर); विनोदकुमार माने (गोंदिया); दतात्रय खोबळे (सोलापूर) यांचा समावेश आहे.

anews Banner

Leave A Comment