*उंद्री(प.दे) येथे नवीन डीपी मंजुरी साठी ‘माजी आमदार बेटमोगरेकरांचे” ऊर्जामंत्र्यांना पत्र…ऊर्जा मंत्रालयाकडून तात्काळ कार्यवाहीचे निर्देश*
जाहूर,(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
मागील काही वर्षापासून उंद्री ( प.दे ) येथील वाढती लोकसंख्या त्यामुळेच वाढता वीजेचा वापर यामुळे येथे *वीजेचा दाब अचानक कमी-जास्त होवून* वारंवार *वीजपुरवठा खंडीत* होत असल्याने तसेच गावकऱ्यांच्या वतीनेही वारंवार ट्रान्सफॉर्मर जळत असल्याचीही तक्रार होत असल्याने त्याचा त्रास गावकऱ्यांसमवेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही याचे परिणाम होत असल्याकारणाने उंद्री(प.दे) येथे नवीन डी.पी. मंजुर करून गावकऱ्यांच्या व विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी यासाठी मुखेड-कंधार तालुक्याचे *माजी आमदार हणमंतराव पा.बेटमोगरेकर* यांनी पत्राद्वारे *मा.ना.नितीन राऊत साहेब* ( ऊर्जामंत्री, महाराष्ट्र शासन) यांच्याकडे मागणी केली.
पत्रातील या मागणीवर *ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र शासन* यांच्यातर्फे *महावितरण, नांदेड* यांना *तात्काळ कार्यवाही* करावी असे निर्देश दिले गेले आहेत.