*जिल्हा काँग्रेसच्या वतीने पदाधिकार्यांच्या नियुक्त्या*
सटाणा,(जगदिश बधान तालुका ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
२५ सप्टें.रोजी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा सरचिटणीस पदी गोपाळ लहांगे, सचिन होळकर, संजय पाटील आधी पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी डॉ तुषार शेवाळे यांनी बोलताना सांगितले की जिल्ह्यात कॉंग्रेसच्या विविध समाज उपयोगी आणि समाजहितासाठी काम उभे करून अधिकाधिक लोकांपर्यंत पक्षाचे ध्येय धोरण पोहचवा. ते पक्षाच्या पदाधिकारी नियुक्त्या वेळी बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश कहांडोळे, दिगंबर गिते, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, कचरु पाटील शिंदे, प्रकाश पिंगळ, अल्तमश शेख, प्रशांत बाविस्कर, धर्मराज जोपळे, अशोक थेटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.