Home Breaking News *जिल्हा काँग्रेसच्या वतीने पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या*

*जिल्हा काँग्रेसच्या वतीने पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या*

108
0

*जिल्हा काँग्रेसच्या वतीने पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या*
सटाणा,(जगदिश बधान तालुका ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
२५ सप्टें.रोजी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा सरचिटणीस पदी गोपाळ लहांगे, सचिन होळकर, संजय पाटील आधी पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी डॉ तुषार शेवाळे यांनी बोलताना सांगितले की जिल्ह्यात कॉंग्रेसच्या विविध समाज उपयोगी आणि समाजहितासाठी काम उभे करून अधिकाधिक लोकांपर्यंत पक्षाचे ध्येय धोरण पोहचवा. ते पक्षाच्या पदाधिकारी नियुक्त्या वेळी बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश कहांडोळे, दिगंबर गिते, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, कचरु पाटील शिंदे, प्रकाश पिंगळ, अल्तमश शेख, प्रशांत बाविस्कर, धर्मराज जोपळे, अशोक थेटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Previous article*वडगांव येथे हातकणंगले तालुका सर्वपक्षीय कृती समिती कडून शेती विधेयकांची होळी*
Next articleराज्यात सर्व जिल्ह्यात महिला व बालविकास भवनाची स्थापना करणार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here