• Home
  • *वडगांव येथे हातकणंगले तालुका सर्वपक्षीय कृती समिती कडून शेती विधेयकांची होळी*

*वडगांव येथे हातकणंगले तालुका सर्वपक्षीय कृती समिती कडून शेती विधेयकांची होळी*

*वडगांव येथे हातकणंगले तालुका सर्वपक्षीय कृती समिती कडून शेती विधेयकांची होळी*

*मोहन शिंदे कोल्हापूर प्रतिनिधी*

केंद्र सरकारने 5 जून रोजी जारी केलेले तिन्ही शेतकी अध्यादेश आणि लोकसभेत पास केलेल्या विधेयकांना कडाडून विरोध करण्याचा निर्धार देशातील सर्व शेतकरी संघटनांनी केला आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर मध्ये सर्व संघटना पक्ष कृती समितीच्या वतीने 25 सप्टेंबर रोजी संसदेत पास केलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांची वडगाव नगरपालिका चौकात होळी करण्यात आली.
या प्रसंगी शेतकरीविरोधी
मोदी सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या ताब्यात देणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो , शेती आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाची, भांडवलदार धार्जिणे शेती विधेयके हाणून पाडा शेतमालाला आम्ही भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी बोलताना आमदार राजू बाबा आवळे म्हणाले, चहा विकणाऱ्या या व्यक्तीने पंतप्रधान झाल्यानंतर देश विकायला काढला आहे.तिन्ही शेती विधेयक / कायद्यामुळे पिकांची सरकारी खरेदी पूर्ण पणे थांबेल आणि खासगी बाजार स्थापन होऊन शेतकऱ्यांना मिळणारा हमीभाव बंद होईल, तसेच सर्व धान्य, डाळी, तेल ,बिया, कांदा आणि बटाटा या वस्तू अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून काढल्या जातील.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सह सेक्रेटरी गिरीश फोंडे म्हणाले, शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळत राहील, हे भाजपचे अध्यक्ष श्री. नड्डा यांचे आश्वासन धादांत खोटे आहे. कारण केवळ 6% शेतकरीच या हमीभावाचा लाभ घेतात, त्यामुळे हमीभाव देण्याची काही गरज नाही, एफसीआय आणि नाफेड खरेदी देखील थांबवावी, तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत होणारा अन्नधान्याचा पुरवठाही थांबवावा, असे खुद्द भाजप सरकारने नियुक्त केलेल्या शांता कुमार समितीनेच जाहीर केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वैभव कांबळे म्हणाले मोदी सरकार हमीभाव व स्वामीनाथन आयोग बद्दल बोलत नाही. जगभरातील सर्व देशांमध्ये शेतकर्‍यांच्या उत्पादनाला हमीभाव हा नेहमीच कंपन्यांकडून नव्हे तर सरकारकडून दिला जातो. एकही देश याला अपवाद नाही. कंपन्या तर केवळ स्वस्त दरात शेतीमाल खरेदी करून चढ्या दराने विकण्याचे आणि नफा कमावण्याचे काम करतात. एकदा पीक तयार झाले की त्याची विक्री करावीच लागते, अन्यथा ते नष्ट होते.
काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवानराव जाधव यांचे भाषण झाले. त्यांनी मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर कडाडून टीका केली.
यावेळी बबनराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ,संभाजी पवार, शेकाप च्या सौ.स्वाती क्षिरसागर, संपतराव पवार, वडगांव शहर काँग्रेस अध्यक्ष सचिन चव्हाण, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष कपिल पाटील ,अन्सार देसाई , जमीर गडकरी , रघुनाथ पिसे सेवादल जिल्हा सचिव , रणजीत पाटील, वडगांव युवक काँग्रेस अध्यक्ष किरण पाटील, गौरव पाटील शिवाजी आंबेकर, रमेश पाटोळे, नितीन सनगर, अभिजीत दबडे, विकास कांबळे, शेतकरी संघटना शहर अध्यक्ष सत्यशील जाधव , शकील अत्तार, सुनील सलगर यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment