🛑 पुणे हादरले २४ तासात रेकॉर्ड ब्रेक! कोरोना रुग्णांची वाढ 🛑
✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
पुणे :⭕लॉक डाऊन शिथिल केल्यानंतर शासनाने बिगिन अगेन ही मोहीम सुरु केली. त्यामुळे गर्दी वाढू लागल्याने पुण्यात संक्रमणाचे प्रमाण वाढू लागले आहे.
मागील 24 तासांमध्ये शहरात तब्बल 460 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातली एकूण संख्या 10 हजारांच्या वर गेली आहे. पुण्यात दिवसभरात 117 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.
पुण्यात आत्तापर्यंत 481 जणांचा मृत्यू झाला असून 232 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 44 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १० हजार 643 वर गेली आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
आजही 3 हजार 307 रुग्णांची नव्याने भर पडली. त्यामुळे एकूण संख्या 1 लाख 16 हजारांवर गेली आहे. तर आज 114 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 5 हजार 651वर गेली आहे…⭕