Home गुन्हेगारी National News प्रेमात धोका! दोघांनी सोबत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला! प्रेयसीने नदीत...

National News प्रेमात धोका! दोघांनी सोबत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला! प्रेयसीने नदीत उडी मारली अन् प्रियकर उडी न मारताच पळाला!

39
0

आशाताई बच्छाव

IMG-20220620-WA0003.jpg

National News प्रेमात धोका! दोघांनी सोबत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला! प्रेयसीने नदीत उडी मारली अन् प्रियकर उडी न मारताच पळाला!

लखनौ(युवा मराठा न्युज ग्रुप नेटवर्क): साथ जियेंगे और साथ मरेंगे अशी शपथ दोघांनी घेतली. एकमेकांशी भांडण झाल्याने प्रेमीयुुगलाने सोबत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. जोडपे नदीच्या काठावर पोहचले. दोघांनी एकमेकांना कडाडून मिठी मारून आता पुढच्या जन्मातच भेटू असे म्हणत एकमेकांचा निरोप घेतला. प्रेयसीने नदीत उडी मारली मात्र तेवढ्यात प्रियकर उडी न मारता पळून गेला. प्रेयसीला पोहता येत असल्याने ती पोहत पोहत बाहेर आली अन् तिने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत प्रियकराने धोका दिल्याची तक्रार दिली.

उत्तरप्रदेशातील प्रयागराज मध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. जोडप्याची विचित्र लव्हस्टोरी ऐकून पोलिसही क्षणभर चक्रावून गेले. या प्रकरणातील प्रेयसी ही ३२ वर्षांची विवाहित असून तिचा प्रियकर तिच्यापेक्षा २ वर्षांनी लहान आहे. वयाने मोठ्या असलेल्या नवऱ्याशी पटत नसल्याने तिचे तरुणासोबत सुत जुळले होते. गेल्या तीन वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. सोबत जगण्यामरण्याच्या आणाभाका त्यांनी घेतल्या होत्या.

Previous articleसंग्रामपूर तालुक्यात दहावी चा निकाल ९६.३४टक्के आठ शाळांचा १०० टक्के निकाल.१५०३ विद्यार्थी उत्तीर्ण.
Next articleपाऊस नावाला, दामिनीचे मात्र थैमान ! वीज पडून एकाचा मृत्यू ; एक गंभीर …!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here