आज वटपौर्णिमा
वटपौर्णिमा निमित्त सर्व माता भगिनींना
युवा मराठा न्युज तर्फे हार्दिक शुभेच्छा
( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी)
महाराष्ट्र : वटसावित्रीच्या दिवशी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यंदा सावित्रीची ही प्रार्थना केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठीच नव्हे, तर कोरोनापासून प्रत्येकाच्या बचावासाठी करण्याची वेळ आली आहे. ५ जून रोजी असलेल्या वट पौर्णिमेवर कोरोनाची गडद छाया निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना पहिल्यांदाच आपल्या घरीच वट पौर्णिमेचे पूजन करावे लागणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा फटका प्रत्येक क्षेत्राला बसत आहे. कोरोनापासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून धार्मिक कार्यक्रमही बंद ठेवण्यात आले आहेत. कोरोनाचे हे संकट वटपौर्णिमेवरही निर्माण झाले आहे. वटपौर्णिमा सण सुवासिनी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा समजल्या जातो. सुवासिनी महिला ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वडाचे पूजन करून आपल्या पतीच्या दीर्घआयुष्यासाठी प्रार्थना करतात. वडाच्या साक्षीने महिला श्रद्धाभावाने उपवास करून हे व्रत करतात. मात्र यंदा ५ जून रोजी होणाऱ्या वटपौर्णिमेवर कोरोनाचे संकट निर्माण झालेले आहे. पतीच्या दीर्घायुष्यासोबत कोरोनाचे हे संकट टाळण्याची प्रार्थना महिलांकडून होणार आहे. महिलांचा महत्त्वाचा सण कोरोनामुळे घरातच साजरा करण्याची वेळ आली आहे. वडाजी पूजा करण्यासाठी महिलांची गर्दी होते. महिला व युवतींची ही मैफिल कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढविण्याची भीती व्यक्त होत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचा प्रश्नही यानिमित्त समोर येत आहे. घरातच हे पूजन केले तर संसर्गापासून बचाव होऊ शकतो.