आशाताई बच्छाव
चाकण येथे ऑपरेशन शेंदूर(तिरंगा रॅली)चे आयोजन* (पुणे प्रतिनिधी – राकेश बेहेरे पाटील).
चाकण (पुणे) दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेला भ्याड हल्ला करून भारतीय नागरिकांचे प्राण घेतले त्या बदल्यात भारतीय तिन्ही दलातील सैन्य व भारत सरकारने यांनी पाकड्यांचा दहशतवाद्यांचा बदला घेतला आणि पुन्हा जगाला दाखवून दिलं की भारत देश हा दहशतवाद कदापी खपवून घेणार नाही आणि भारत देश किती शक्तिशाली व किती धर्याने लढू शकतो हे एकदा पुन्हा सिद्ध झालं भारतीय सैन्याचे ज्यांनी हे ऑपरेशन सिंदूर राबवले अशा भारताच्या दोन्ही शक्तिशाली नारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या दोन प्रमुख महिला अधिकारी यांनी जगाला दाखवून दिले की भारतीय नारी सुद्धा कमी नाही हाच भारतीय सैन्याने व भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर हे यशस्वीरित्या विजय मिळवल्याबद्दल भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी आणि अजून अधिकचे प्रोत्साहन देण्यासाठी आज चाकण व चाकण परिसरामध्ये ऑपरेशन सिंदूर तिरंगा विजय रॅली काढण्यात आली यावेळी चाकण व चाकण परिसरामध्ये देशभक्तीपर गीते गाऊन, प्रत्येक नागरिकाच्या हातामध्ये भारतीय तिरंगा देऊन रॅली काढण्यात आली. यावेळी चाकण मधील सर्व हिंदू संघटना, श्रीराम नवमी उत्सव समिती, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद आणि खान्देश मित्र परिवार व चाकण मधील नागरीक व चाकण परिसरातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.






