आशाताई बच्छाव
माहोरा परिसराला अवकाळी पावसाने झोडपले
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील माहोरा परीसरात दिनांक 16 मे शुक्रवार दुपारी अचानक आकाशात ढगळ वातावरण तयार झाले. 2 वाजेच्या सुमारास अच्यानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली .तसेच माहोरा येथील आठवडी बाजार असल्यामुळे खेड्या पाड्यातील महिला व पुरुष मोठया प्रमाणात बाजार साठी येतात.अचानक आलेल्या पावसामुळे तारंबळ उडाली जेथे सहारा मिळेल तेथे बाजार साठी आलेल्यांनी पसंत केले.
पाऊस आणि वारा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बाजार मधील दुकानदारांची परेषाणी व नुकसान झाले.
या पावसामुळे खरीप पेरणी साठी शेती मशागत करून ठेवण्यासाठी मदत होईल असे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे.






