Home सांस्कृतिक वटपौर्णिमा निमित्त सर्व माता भगिनींना ⭕युवा मराठा न्युज तर्फे हार्दिक शुभेच्छा

वटपौर्णिमा निमित्त सर्व माता भगिनींना ⭕युवा मराठा न्युज तर्फे हार्दिक शुभेच्छा

92
0

🛑 आज वटपौर्णिमा 🛑
वटपौर्णिमा निमित्त सर्व माता भगिनींना
⭕युवा मराठा न्युज तर्फे हार्दिक शुभेच्छा ⭕
( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी)

महाराष्ट्र :⭕ वटसावित्रीच्या दिवशी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यंदा सावित्रीची ही प्रार्थना केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठीच नव्हे, तर कोरोनापासून प्रत्येकाच्या बचावासाठी करण्याची वेळ आली आहे. ५ जून रोजी असलेल्या वट पौर्णिमेवर कोरोनाची गडद छाया निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना पहिल्यांदाच आपल्या घरीच वट पौर्णिमेचे पूजन करावे लागणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा फटका प्रत्येक क्षेत्राला बसत आहे. कोरोनापासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून धार्मिक कार्यक्रमही बंद ठेवण्यात आले आहेत. कोरोनाचे हे संकट वटपौर्णिमेवरही निर्माण झाले आहे. वटपौर्णिमा सण सुवासिनी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा समजल्या जातो. सुवासिनी महिला ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वडाचे पूजन करून आपल्या पतीच्या दीर्घआयुष्यासाठी प्रार्थना करतात. वडाच्या साक्षीने महिला श्रद्धाभावाने उपवास करून हे व्रत करतात. मात्र यंदा ५ जून रोजी होणाऱ्या वटपौर्णिमेवर कोरोनाचे संकट निर्माण झालेले आहे. पतीच्या दीर्घायुष्यासोबत कोरोनाचे हे संकट टाळण्याची प्रार्थना महिलांकडून होणार आहे. महिलांचा महत्त्वाचा सण कोरोनामुळे घरातच साजरा करण्याची वेळ आली आहे. वडाजी पूजा करण्यासाठी महिलांची गर्दी होते. महिला व युवतींची ही मैफिल कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढविण्याची भीती व्यक्त होत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचा प्रश्नही यानिमित्त समोर येत आहे. घरातच हे पूजन केले तर संसर्गापासून बचाव होऊ शकतो.⭕

Previous articleलाच मागणाऱ्या हवालदारावर गुन्हा दाखल.
Next articleभर पावसात वृत्तपत्र विक्रेत्यांना सेवा सहयोग फाउंडेशन केले धान्यवाटप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here