• Home
  • लाच मागणाऱ्या हवालदारावर गुन्हा दाखल.

लाच मागणाऱ्या हवालदारावर गुन्हा दाखल.

नाशिक :लाच मागणाऱ्या हवालदारावर गुन्हा दाखल.

नाशिक (प्रविण अहिरराव प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- नाशिक जिल्ह्यात हॉटेल चालू देण्यासाठी एका हवालदाराने लाच मागितली होती. या हवालदारस लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

वसंत दगडु खताळ असे पोलिस हवालदाराचे नाव आहे. याबाबत वणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार वसंत खताळ यांनी 8 हजार रुपये हप्ता पोटी 3000 लाचेची मागणी केली होती. ती मागणी निष्पन्न झाली यावरुन गुन्हा दाखल झाला आहे.

anews Banner

Leave A Comment