Home जालना 21 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन 

21 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन 

89

आशाताई बच्छाव

1001510855.jpg

 

21 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

जालना दि.16 (जिमाका): नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने तसेच रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,जालना यांचे मार्फत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, 2 रा मजला जिल्हाधिकारी कार्यालय जालना 431203 येथे दि. 21 मे, 2025 बुधवार रोजी “प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधी”चे आयोजन सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. यासाठी टी.व्ही.एस. सप्लाय चैन सोल्युशन्स प्रा. लि. पुणे दहावी, बारावी, आयटीआय/पदवीधर बी.ए, बी.कॉम, बी.एसी उत्तीर्ण करिता फ्लोअर स्टाफ चे 50 पदे, डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी कोपा,आयटीआय / MS-CIT कॉम्पुटर ऑपरेटर उत्तीर्ण करिता 10 पदे, टो ऑपरेटर करिता डीझेल मेकेनिकॅल, ट्रक्टर मेकेनिकॅल, मोटार मेकेनिकॅल उत्तीर्ण करिता 50 पदे, तसेच अन्नपूर्णा फायनन्स  प्रा.लि. जालना यांची दहावी, बारावी, पदवीधर उत्तीर्ण करिता फील्ड क्रेडीट एक्झीकेटीव्हसाठीचे 20 पदे, मार्केटींग एक्झीकेटीव्ह करिता कोणतीही पदवी उत्तीर्णकरिता 20 पदे, अशी एकूण 120 रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत. याकरीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणा-या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध आहे. जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.असे कळविण्यात आले आहे.

Previous articleभाजपाच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन
Next articleसमाज कल्याण कार्यालय ‘रामभरोसे !’ – दिव्यांग लाभार्थी -झिझवतात कार्यालयाचे उंबरठे!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.