Home नांदेड नांदेड तहसीलचा मराठवाड्यात पहिला क्रमांक 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा मोहिमेत लक्षणीय कामगिरी. ...

नांदेड तहसीलचा मराठवाड्यात पहिला क्रमांक 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा मोहिमेत लक्षणीय कामगिरी.   

88

आशाताई बच्छाव

1001510820.jpg

नांदेड तहसीलचा मराठवाड्यात पहिला क्रमांक
100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा मोहिमेत लक्षणीय कामगिरी.                                  लवकरच आपल्या सेवेत रुजू होत आहोत…. आश्रयआशा एन्टरप्रायजेस
आमच्याकडे खालील सगळ्या प्रकारचे कामे योग्य व माफक दरात करुन मिळतील!
🔴 धर्मादाय संस्था नोंदणी 🟢 सहकारी संस्था नोंदणी
🟡 वृत्तपत्र रजिस्ट्रेशन
🔵 निती आयोग रजिस्ट्रेशन
🔴 शेती प्लाँट विक्री 🟢 खरेदीखत दस्त नोंदणी 🔴 नोटरी प्रतिज्ञापत्र 🔵 स्टँम्प अँफिडेव्हिट🟢 भाडे करारनामा 🟡 संस्था आँडिट रिपोर्ट 🔴 ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन 🔴 आय एस ओ रजिस्ट्रेशन
🟡 त्याशिवाय सगळ्या प्रकारचे शासकीय, निमशासकीय अर्ज बनवून मिळतील
🟢 महिला अन्याय अत्याचार बाबत सहाय्य व मार्गदर्शन
संचालक: राजेंद्र पाटील राऊत, श्रीमती आशाताई बच्छाव पता 👉 जुन्या तहसील कार्यालयाच्या मुख्य गेटसमोर, मालेगाव जि.नाशिक संपर्क 9850447685/9923362030

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड, दि. 16 मे :- शासनाच्या 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा विशेष मोहिमेंतर्गत नांदेड तहसील कार्यालयाने सर्वांगीण उत्कृष्ठ कामगिरी करत मराठवाडा विभागात अव्वल स्थान मिळवले आहे. तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक, डिजिटल व नागरिकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार संजय वारकड यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे.

या मोहिमेंतर्गत नांदेड तहसीलने पुढील महत्त्वाच्या बाबींमध्ये प्रगती साधली आहे: डिजिटल तहसील नांदेड अ‍ॅपच्या माध्यमातून 23 योजनांची माहिती व 20 प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी अर्जाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सेवांद्वारे आज पर्यंत अखेरपर्यंत १४ हजारहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. जलद प्रमाणपत्र वितरण सेवा सुरू करण्यात आली असून, 24 तासांत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा गुगल फॉर्मद्वारे उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत 217 नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. कार्यालयीन स्वच्छता, सुसज्ज प्रतीक्षागृह, आरो फिल्टरड पाणी व्यवस्था, डिजिटल लायब्ररी व सायबर वॉल प्रकल्प राबवून कार्यालयात आधुनिकतेचा अवलंब करण्यात आला आहे. ई-ऑफिस प्रणालीच्या 100 टक्के अंमलबजावणीमुळे कार्यक्षमतेत मोठी वाढ झाली असून जानेवारी ते एप्रिल दरम्यान 127 ई-फाईल्स आणि 544 ई-रजिस्टरचे कामकाज पार पाडले गेले. तक्रार निवारणासाठी ‘लोकशाही दिन’, ‘आपले सरकार’ व पीजी पोर्टल’ यांचा प्रभावी वापर करून सर्व तक्रारींवर वेळेत कार्यवाही करण्यात आली आहे. एआय आधारित तंत्रज्ञान जसे की ChatGPT व Grok चा वापर करून कामाच्या कार्यक्षमतेत नवचैतन्य निर्माण करण्यात आले आहे. नांदेड तहसीलची ही प्रगती केवळ तालुक्यापुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या कामा मध्ये नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार , काशिनाथ डांगे, नितेश कुमार बोलुलु , इंद्रजीत गरड, रवींद्र राठोड, सहाय्यक महसूल अधिकारी देविदास जाधव, कोटूरवार, सुचिता बोधगिरे, सुरेखा सुरुंगवाड, मंडळ अधिकारी शिवानंद स्वामी, लक्ष्मण नरमवार, व्‍यंकटी मुंडे, संतोष निलावार ,सचिन होंडाळकर, बालाजी नीलमवार सर्वच तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक कोतवाल मंडळींनी परिश्रम घेतले आहेत.

Previous articleविधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बैठकीत घेतला विविध विषयांचा आढावा
Next articleभाजपाच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.