Home अमरावती अमरावती शहरात एका तासात १०मिमीपाउस: जिल्ह्यात जिल्ह्यात २१ मी पर्यंत वादळ पावसाची...

अमरावती शहरात एका तासात १०मिमीपाउस: जिल्ह्यात जिल्ह्यात २१ मी पर्यंत वादळ पावसाची शक्यता

145

आशाताई बच्छाव

1001510106.jpg

अमरावती शहरात एका तासात १०मिमीपाउस: जिल्ह्यात जिल्ह्यात २१ मी पर्यंत वादळ पावसाची शक्यता. युवा मराठा . रावसाहेब उर्फ पी.एन.देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती शहराला एक तास मुसळधार पावसाने झोडपून काढले एका तासात१०मिमी पावसाची नोंद झाली गुरुवारी दुपारी १.३०ते.३० पर्यंत धो धो पाऊस उसळत राहिला यामुळे शहराच्या विविध भागात नाल्याचे सांडपाणी रस्त्यावर आले त्यामुळे सर्वत्र चिखल दिसत होता तसेच खोलगट भागात पाण्याचे टक्के साचले होते या एक तासाच्या कालावधीत अवकाळी पावसामुळे शहरातील रस्त्यावर वाहतूक ठप्प पडली होती नागरिकांनी पावसापासून बचाव होईल अशा सुरक्षित स्थानाचा आश्रय घेतला होता सुमारे एक तास धो धो पाऊस पडत राहिला यामुळे शहराच्या अनेक भागात विद्युत पुरवठा पाच तास खंडित झाला होता यामुळे शहराच्या अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला खोलगट भागात असलेले काही दुकानांमध्ये पाणीही शिरले मनपा मुख्यालयात असलेले मनभरी साईनगर येथे राखी कॉम्प्लेक्स महात्मा फुले मार्केट तसेच गोपाल नगर येथील निर्माण दिन भुयारी मार्गातही पाणी भरण्याची माहिती अग्निशामन विभागाद्वारे देण्यात आली वादळाचा जोर फारसा नसल्यामुळे केवळ काही झाडांच्या फांद्या तुटल्या त्या नागरिकांनीच बाजूला केल्या अचलपूर तालुक्यातील वडगाव फतेपुर येथील जांभळा शिवाय तीन वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्या सह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा संत्रा बागेचा मोठे नुकसान झाले आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले अचलपूर तालुक्यातील वडगाव फतेपुर येथील बागायतदार शेतकरी भगवान कोळपेयाची७५ झाडे, अण्णाजी सोनाजी कोकरे १० झाडे भगवान पांडूजी कोळपे११ झाडे असे एकूण ९६ संत्रा झाडे जमीन दोस्त झाली असून त्यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे दर्यापूर तालुक्यात अवकाळी पाऊस तरी शहर व तालुक्यात बुधवारी रात्री अवकाळी पाऊस सरीने हजेरी लावली तसेच गुरुवार सकाळपासून ढगाळ वातावरण असून दिवसभर ऊन सावली असा खेळ सुरू होता एकंदरीत अवकाळी पावसामुळे मे महिन्यात उकड्यापासून दिलासा मिळाला आहे जिल्ह्यात २१ मेपर्यंत वादळी पावसाची शक्यता जिल्ह्यात येत्या २१ मी पर्यंत काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे बिहार ते कर्नाटक असा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो विदर्भावरून गेल्यामुळे जिल्ह्याच्या बहुतांश्या तालुक्यात गुरुवारी मध्यम ते मुसळधार पाऊस झाला त्यामुळे संत्रा कांदा ज्वारी या उन्हाळी पिकाचे नुकसान झाले आहे.

Previous articleएकता आभुषनच्या ३ दुकानावर आयकर ची धाड अमरावती अकोला व परतवाडा येथे प्रतिष्ठानचा समावेश. दै
Next articleविधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बैठकीत घेतला विविध विषयांचा आढावा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.