Home कोकण आताची सर्वात मोठी बातमी! आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का, ४ फेब्रुवारीपर्यंत...

आताची सर्वात मोठी बातमी! आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का, ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी                   

93
0

राजेंद्र पाटील राऊत

**************************
आताची सर्वात मोठी बातमी! आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का, ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी                                रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आहे. कणकवली दिवाणी न्यायालायने हा निर्णय दिला आहे.
सरकारी वकीलांनी नितेश राणे यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास अहवाल कोर्टात सादर केला. नितेश राणे यांचा थेट सहभाग गुन्ह्यात आहे, असं म्हणणं पोलिसांनी मांडलं आहे. ज्या पीएच्या फोनवरुन फोन केले होते, त्या पीएलादेखील अटक केली असून दोघांना समोरा-समोर बसवून चौकशी करायची आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
यानंतर न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना दोन दिवसांची म्हणजे ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कणकवली दिवाणी न्यायालयाबाहेर नितेश राणे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणाव जमले आहेत.
त्याआधी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांनी जामीन अर्जासाठी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. पण आज त्यांनी हा अर्ज मागे घेतला.
———————————————-
त्यानंतर नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग तपास अधिकाऱ्यांकडे शरणागती पत्करली. त्यानंतर ते कणकवली दिवाणी न्यायालयात दाखल झाले.
चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार असल्याचं नितेश राणे यांचे वकील अॅड. सतिश मानेशिंदे यांनी सांगितलं. नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या संरक्षणामध्ये पाच दिवस शिल्लक असतानाही तपास अधिकाऱ्यासमोर शरण जात असल्याचं सांगत हायकोर्टातील जामीन अर्ज मागे घेतला आहे अशी माहिती अॅड सतिश मानेशिंदे यांनी दिली.
न्यायालयाच्या निर्णयाचा आदर
सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचा आदर ठेवून शरण जात असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं, आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने राज्य सरकारने मला अटक करण्याचा प्रयत्न केला, पण मी आज स्वत:हून न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून शरण जात असल्याची प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीदरम्यान शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबरला जीवघेणा हल्ला झाला होता. इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी आपल्यावर शस्त्राने हल्ला केल्याचा दावा संतोष परब यांनी केला आहे. या हल्लामागे भाजप आमदार नितेश राणे असल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता. संतोष परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय आहेत.
________________________

Previous articleदेशाची संपत्ती मोठ्या उद्योग पतीच्या घशात घालणारा अर्थसंकल्प——–महेंद्र ब्राम्हणवाडे
Next articleगावातील युवकांनी ग्रामविकास करिता सुध्दा असाच पुढाकार घ्यावा ! आमदार डॉ देवराव होळी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here