राजेंद्र पाटील राऊत
मुजको राणाजी माफ करना……. गलती म्हारेसे हो गयी!लोकप्रातिनिधी राणा दांपत्यांची आमदारकी व खासदारकी धोक्यात?
ठाणे : (प्रतिनिधी, युवा मराठा न्यूज चॅनल)
खासदार नवनीत राणा यांच्या पाठोपाठ त्यांचे पती आणि वडणेरा चे आमदार रवी राणा यांचा अडचणीत वाढ होणार आहे.
आधीच खासदार नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आले आहे, त्यातच आमदार रवी राणा यांची देखील आमदारकी धोक्यात येण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
काय आहे प्रकरण,कुठे चुकले राणा दाम्पत्य?
आमदार रवी राणा यांनी निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या खर्चाचे प्रकरण समोर आले आहे. सन २०१९ ला रवी राणा यांनी बडनेरा. मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी निवडणूक खर्चाची मर्यादा २८ लाख होती परंतु राणांनी ४१ लाख ८८ हजार ४०२ रूपये इतका केला.
या प्रकरणी जिल्हाधकाऱ्यांनी या संबंधी अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला,परंतु निवडणूक आयोगाने कोणतीच कारवाई केली नाही. याच प्रकरणी सुनील भालेराव व सुनील खराटे कोर्टात गेले होते. कोर्टाने निवडणूक आयोगाला आठ दिवसाचा वेळ दिला आहे अहवाल सादर करण्यास जर निवडणूक आयोगाने जिल्हाधिाऱ्यांमार्फत दिलेला अहवाल सादर केला तर आमदार रवी राणा यांचा अडचणीत वाढ होणार आहे!
त्याच सोबत रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांचे प्रकरण कोर्टात आहे,आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांनी खोटी कागदपत्र सादर केल्याचा आरोप केला आहे,या प्रकरणी उच्च न्यायालयात आनंदराव अडसूळ यांच्या बाजूने निकाल दिला आहे.
या कोर्टाच्या निर्णयाविरोधात खासदार नवनीत राणा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.