Home Breaking News अवैध उत्खनन करणाऱ्या अजयदिप ,शारदा ,रूद्रायणी कन्स्ट्रक्शन वर कारवाई करण्यात यावी

अवैध उत्खनन करणाऱ्या अजयदिप ,शारदा ,रूद्रायणी कन्स्ट्रक्शन वर कारवाई करण्यात यावी

349
0

अवैध उत्खनन करणाऱ्या अजयदिप ,शारदा ,रूद्रायणी कन्स्ट्रक्शन वर कारवाई करण्यात यावी

वैभव पा.राजुकर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणा सुरू

संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका शहर प्रतिनिधी

अजयदिप कन्स्ट्रक्शन , रूद्रायणी कन्स्ट्रक्शन , शारदा कन्स्ट्रक्शन यांनी राष्ट्रीय महामार्गात अवैध गौण खनिज उत्खनन केले आहे. गेल्या एक वर्षापासुन पाठपुरवा करून ही महसुल विभाग संबंधित कंस्ट्रक्शनवर कार्यवाही करण्यास टाळाटाळ करत असल्याने अखेर महसुल प्रशासनाच्या विरोध्दात स्वाभीमानी संभाजी बिग्रेडचे विद्यार्थी आघाडी चे जिल्हाध्यक्ष वैभव पा.राजुरकर व यौगेश पा.जांबळीकर यांनी दि १२ ऑगस्ट रोजी पांसुन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे.

मुखेड तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ( अ ) कुद्रांळ ते वझर ,कुद्रांळ ते उस्माननगर व देगलूर ते मुखेड या राष्ट्रीय महामार्गाचे कामा चालू असताना या कामा करीता मोठ्या प्रमाणात शासनाचा मुरूम व गौण खनिजाचे विना परवानगी उत्खनन करून गैर वापर झालेला आहे.सदरील मुरूमाचे उत्खननाचे शासनाकडे कोणतेही रॉयल्टी भरण्यात आलेली नसताना सुद्धा जाणीपुर्वक महसुल अधिकारी , कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष करून शासनाचे कोट्यावधी रूपयाचे नुकसान करत असल्याचे वैभव पा.राजुरकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतातुन मुरूम घेऊन गेले आहेत.त्यांच्या शेताची प्रत्यक्ष पाहणी करून शेतात शेततळे आहे किंवा कसे आहे याची पाहणी करावी.कारण शेतात शेततळे न काढता केवळ मुरूम उत्खनन करून घेण्यात आले आहे.त्यामुळे शासन निर्णयातील तरतुदीचा भंग करून मुखेड तालुक्यात रस्ते बांधकामात अवैध पध्दतीने मुरूम उत्खनन करून वाहतुक करण्यात आली.

तालुक्यातील कोणत्याही तलाव नदीमधून गाळ काढण्यात आलेला नाही.शासन निर्णय दि .२ ९ / ११ / २०१७ मधील ( ९ ) तरतुदीनुसार कार्यकारी अभियंता यांनी उपयोगीता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.मात्र शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देऊन सदर मुरुमाची अवैधपणे उत्खनन केलेले आहे. त्यामुळे सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना मार्फत समिती नेमून तात्काळ चौकशी करून या रस्त्याचे काम करणारे अजयदिप कन्स्ट्रक्शन , रूद्रायणी कन्स्ट्रक्शन व शारदा कन्स्ट्रक्शन यांच्या विरूध्द जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४८ ( ७,८ ) अन्वये दंडात्मक कारवाई करावी यासाठी वैभव पा.राजुरकर व यौगेश पा.जांबळीकर यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबले आहे.या प्रकरणामध्ये उपविभगीय अधिकारी , तहसीलदार , मंडळ अधिकारी , तलाठी यांचा सहभाग असल्याने कारवाई करण्यास टाळाटाळ होत असुन संबंधित कन्स्ट्रक्शनला महसुलचे अधिकारी पाठीशी घालत असल्याचा घनाघाती आरोप जिल्हा अध्यक्ष वैभव पा.राजुरकर यांनी निवेदनाद्वारे केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यावर काय कारवाई करतील याकडे आत्ता सर्वांचे लक्ष लागले असले तरी मुखेड तालुक्यात अवैध उत्खनन करणे ही येथील कत्रांटदाराची खाशीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here