*विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्या वतीने कोविड रूग्णालयात नाष्टा , जेवनाची सोय*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*
हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरातील पालिकेच्या वतिने व लोकलसहभागातुन धन्वंतरी धर्मार्थ रूग्णालय येथे अद्यावत कोविड रूग्णालय सुरू केले आहे.
सद्या वडगांव शहरात कोविड रूग्णालयाची सोय उपलब्ध नसल्याने अनेकांना जिव गमवावा लागला आहे.
सद्या काही ठिकाणी बेडस् उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती.पेठ वडगांव च्या लोकसहभागातुन व पालिकेच्या वतीने धन्वंतरी धर्मार्थ रूग्णालयामधे चांगल्या प्रकारे रूग्णांची सोय केली जात आहे.
या कोविड रूग्णालयातील रूग्णांना , पालिकेच्या कर्मचाऱ्यांना , कोविड सेंटरमधिल सर्व स्टाफंना पेठ वडगांव येथील श्री विजयसिंह यादव प्रतिष्ठान च्या वतिने मा.विद्याताई पोळ यांच्या मार्गदर्शनाने दररोज सकाळ , संध्याकाळच्या चहा ,नाष्टा , दुध , व दोन वेळच्या जेवनाची उत्कृष्टरित्या सोय करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
नेहमीच नागरिकांच्या हितासाठी श्री विजयसिंह यादव प्रतिष्ठान अग्रेसर राहुन वेळोवेळी जनतेच्या सैदव सेवेत उपस्थित आहे.
यावेळी माजी.नगरसेवक राजकुमार पोळ यांच्या हस्ते आज चहा नाष्टा , बिस्किटे देऊन सुरवात करण्यात आली.
याप्रसंगी माजी.नगराध्यक्ष अभिजीत पोळ , नगरसेवक जवाहर सलगर , रणजितसिंह यादव (सरकार ), युवा नेते अभिजीत गायकवाड (दादा) ,
वडगांव शहरकाँग्रेस चे अध्यक्ष सचिन चव्हाण , आनंदा म्हेत्रस , जयकुमार गणपते , चेअरमन संपत दिंडे , नितीन दिंडे , दिपक पाटील , प्राण गंथडे , सचिन पाटील , तसेच पालिकेचे कर्मचारी अमिन तांबोळी , सतिश पोवार ,संतोष वारींगे , अशिष रोटे , नंदू पोळ आदी उपस्थित होते.