आशाताई बच्छाव
बारावीची परीक्षा उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाची
पालघर :सौरभ कामडी
शासकीय आश्रमशाळा सुर्यमाळ येथे बारावी च्या विद्यार्थ्यांना परिक्षेच्या शुभेच्छा देताना पंचायत समिती चे उपसभापती प्रदीप वाघ यांनी सांगितले की बारावीची परीक्षा उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाची आहे.
केवळ उत्तीर्ण होऊन चालणार नाही तर गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्त्वाचे आहे, म्हणून न घाबरता परीक्षेला सामोरे जा, चांगले यश संपादन करा व आयुष्य घडवा असेही ते म्हणाले.
यावेळी विद्यार्थ्यांनी देखील मनोगत व्यक्त केले व शाळे विषयी,शिक्षकां विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी उपसभापती प्रदीप वाघ, सरपंच गीता पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश हमरे, उपसरपंच शिवराम हमरे,माजी सरपंच विष्णू हमरे, ग्रामपंचायत सदस्य संजय हमरे, पांडुरंग वारे,शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य, ग्रामपंचायत चे सदस्य, पालक,शाळचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.