आशाताई बच्छाव
साइबर हल्ल्याबाबत सतर्कता बाळगण्याचे चाळीसगाव शहर पोलीसांचे आवाहन
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – सध्या सायबर अटॅक घडवून आणण्याचा प्रयत्न काही विघातक शक्तींनी सुरू केला आहे. Whats-pp, Email, SMS किंवा सोशल मीडियावरून काही अनोळखी व्हिडिओ लिंक अथवा apk file (मोबाईल अॅप) पाठवली जात आहे.
या फाईल्सचे नाव 1. dance of the hillary 2.tasksche.exe असू शकते. त्या लिंक किंवा फाईल्स ओपन केल्यास मोबाईलमधील माहिती, संपर्क, फोटो, बँकिंग अॅप्स यास धोका पोहोचू शकतो. यामुळे कोणत्याही अनोळखी लिंक किंवा फाईल उघडू नये किंवा डाउनलोड करू नये.
सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सतर्क राहावे व ही माहिती आपल्या संपर्कातील सर्वांपर्यंत पोहचवावी असे आवाहन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यंानी केले आहे.






