Home उतर महाराष्ट्र पाकिस्तानच्या झेंडा पायदळी तुडवत भाजपने केला जल्लोष

पाकिस्तानच्या झेंडा पायदळी तुडवत भाजपने केला जल्लोष

80

आशाताई बच्छाव

1001488604.jpg

पाकिस्तानच्या झेंडा पायदळी तुडवत भाजपने केला जल्लोष
श्रीरामपूर(प्रतिनिधी दिपक कदम)- पाकिस्तानच्या ९ दहशतवादी केंद्रांवर भारताने ऑपरेशन सिंदुर करत बदला घेत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा जल्लोष भाजप नेते दिपक पटारे, शरद नवले, माजी नगरसेवक रवी पाटील, दीपक चव्हाण, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या पुढाकाराने श्रीरामपूर भाजपने शहिद भगतसिंग चौकात साजरा केला. यावेळी अभिषेक खंडागळे, महिला शहराध्यक्ष पुष्पलता हरदास, डॉ.शंकर मुठे, पूजा चव्हाण, दत्ता खेमनर, महेंद्र पटारे, दत्ता जाधव, रूपेश हरकल, भैय्या भिसे उपस्थित होते.
यावेळी बोलताना पटारे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारच्या तिन्ही सैन्य दलांनी पहलगाम हल्ल्याचा बदला घेत ऐतिहासिक कामगिरी केली असून संपूर्ण भारत देशात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. तर शरद नवले म्हणाले की, पाकिस्तानच्या कारवायांना थेट प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने भारताची ताकद जगाला दाखवली आहे. केतन खोरे यांनी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानच्या घरात घुसून भारतीय वायूसेना, नौदल, लष्कराच्या संयुक्त कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याने संपूर्ण विश्वात भारताचे महत्त्व वाढले आहे. तर रवी पाटील यांनी भारताच्या दहशतविरोधी कारवाईमुळे १४० कोटी जनतेत आनंदाचे वातावरण असल्याचे सांगितले. दीपक चव्हाण यांनी पाकिस्तानचा भारताने बदला घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.
यावेळी बैजु तांबडे, रवी पंडित, विशाल अंभोरे, राहुल पांढरे, आसिफ पोपटीया, अक्षदा आछाड, बाळासाहेब हरदास, किरण उईके, अशोक तायडे, निसू बेडेकर, बबलू यादव, विशाल रुपनर,मोहन अढांगळे, संदीप पटारे, उमेश बिडवे, सागर म्हस्के, कार्तिक मंडवे, तेजस उंडे, राजू झांजरी, संकेत पाटील, विशाल फटांगरे, सोमनाथ वराडे, विशाल ठाणगे, आकाश उमाप, रमेश यादव, तेजस गायकवाड, विशाल सुरडकर, मच्छिंद्र धोत्रे, योगेश व्यवहारे, सागर जाधव, सनी बारसे, किरण पठारे, प्रकाश सडमाके, पृथ्वी चव्हाण, उमेश पवार, शरद शिंदे, साजिद शेख, श्रेयस सुवर्णपाठकी, शुभम हरदास, पराग फोपळे, अमोल कांबळे, राजेंद्र चव्हाण, नवनाथ पवार, किरण सिंग टाक, चंदन सिंग जुनी, तुषार कोकरे, सचिन बिडलान आदी उपस्थित होते.

Previous articleश्रीरामपूर शहरात पाणी टंचाई भासू नये यासाठी भाजप प्रयत्नशील
Next articleसाइबर हल्ल्याबाबत सतर्कता बाळगण्याचे चाळीसगाव शहर पोलीसांचे आवाहन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.