Home पुणे निगडी ते लोणावळा’ मेट्रो डीपीआर तयार करा; मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांची...

निगडी ते लोणावळा’ मेट्रो डीपीआर तयार करा; मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांची मागणी

139

आशाताई बच्छाव

1001490170.jpg

निगडी ते लोणावळा’ मेट्रो डीपीआर तयार करा; मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांची मागणी (पुणे प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील ) लोकहिताच्या दृष्टिकोनातून ‘निगडी ते लोणावळा’ मेट्रो डीपीआर तयार करण्यात यावा, अशी मागणी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केली आहे. यावेळी त्यांनी पुणे मेट्रो प्रशासनाचे संचालक अतुल गाडगीळ यांची भेट घेत निवेदन दिले. याबाबत सचिन चिखले यांनी पुणे मेट्रो प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे व पिंपरी चिंचवड शहराला लागून मावळ हा भाग येतो. सध्या पिंपरी ते भक्ती-शक्ती, निगडी मेट्रोचे काम प्रगतीपथावर चालु आहे. नुकतेच काही दिवसांपुर्वी महामेट्रोचे बजेट सादरीकरण झाले. या दरम्यान, संपूर्ण पुणे जिल्ह्यातील महामेट्रोचे सादरीकरण करण्यात आले तसेच बजेट विषयी व त्याचप्रमाणे पब्लिक ट्रान्सपोर्ट विषयी चर्चा करण्यात आली. पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या लगतच असणाऱ्या मावळ या भागातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच व्यावसायिक, कामगारवर्ग यांची मोठ्या प्रमाणात प्रवास चालु असतो. दरम्यान, देहुरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा हा भाग मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्तीचा झाला आहे. शैक्षणिक प्रयोजन तसेच उद्योग, व्यावसायिक दृष्टिकोनातून येथील नागरिकांची पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात लगबग असते. व्यावसायिक आणि कामगार वर्गासाठी मोठ्या प्रमाणावर दळणवळण म्हणजे व्यवसायातील विविध व्यक्ती, संस्था आणि उपक्रमांमध्ये संवाद साधणे, माहिती आणि वस्तूंची देवाणघेवाण करणे. यातून व्यवसायाची कार्यक्षमता, उत्पादकता आणि आर्थिक विकास वाढतो. त्यामुळे लोकहिताच्या दृष्टीकोनातून ‘निगडी ते लोणावळा’ हा मेट्रो मार्ग होणे अत्यंत गरजेचे आहे. तरी येणाऱ्या बजेटमध्ये आपण हा मार्ग घ्यावा व लवकर डिपीआर तयार करून मंजुर करावा, अशी मागणी सचिन चिखले यांनी केली आहे. यावेळी सचिन उदागे, दिपक खैरनार, प्रबुद्ध कांबळे तसेच गणेश वाघमारे उपस्थित होते.

Previous articleनटराज टॉकीज व जीटीपी स्टॉपवर सर्व बसेसला थांबा मंजूर-(आ. अग्रवाल)
Next articleमाहोरा येथील माजी सरपंच अंजनाबाई कासोद यांचे अपघाती निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.