आशाताई बच्छाव
- नटराज टॉकीज व जीटीपी स्टॉपवर सर्व बसेसला थांबा मंजूर-(आ. अग्रवाल)
(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील) धुळे शहरातील ऐंशी फुटी – रस्त्यावर नटराज टॉकीज व देवपुरातील जी.टी.पी. स्टॉप या दोन ठिकाणी एसटी महामंडळाच्या सर्व बसेसना थांबा मंजूर करण्यात आला आहे. सदर थांबा मंजूर करण्यासाठी आ. अग्रवाल यांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता. हे दोन्ही बसथांबे लवकरच कार्यान्वित होणार असल्याने नागरिकांची सोय होणार आहे.
सदर दोन्ही ठिकाणी बस थांबे निर्माण व्हावेत अशी मागणी नागरिकांनी आ. अनुप अग्रवाल यांच्याकडे केली होती. त्यानुसार आ. अग्रवाल यांनी विभाग नियंत्रकांना पत्र बसथांबे निर्माण करण्याबाबत सूचित केले होते. तथापी बस थांबे हे जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील रस्ता सुरक्षा समिती मार्फत मंजूर करण्यात – येत असल्याने विभाग नियंत्रक यांनी त्यांच्याकडे विचारार्थ पत्र सादर केले होते. त्या पत्रास
जिल्हाधिकारी यांचेकडून मंजूरी देण्यात आली आहे. शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तथा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सचिव यांना थांबा निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच हे थांबे कार्यान्वित होणार आहेत. याकामी आमदारांचे स्वीय सहाय्यक किरण चौधरी यांनी विशेष पाठपुरावा केला. याबद्दल त्या भागातील नागरिकांनी त्यांचे कौतुक करुन समाधान व्यक्त केले आहे. तसेच चंद्रशेखर आझाद नगर भागातील साईश्रध्दा मित्र मंडळ व विविध कॉलनीतील युवक योगेश चौधरी, विनोद दांडगे, कमलेश लोंढे, सचिन मराठे, विक्की मराठे, देविदास मराठे, राहुल सोनार, मयूर मराठे, धनंजय चौधरी, प्रकाश चौधरी, निरज परदेशी, भोलाभाऊ सगरे, तेजस पाटील, प्रतिक चव्हाण आदींनी आ. अग्रवाल यांचे आभार मानले आहेत.






