Home पालघर देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व प्रथम आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे बलीदान,स्मृती दिनानिमित्त प्रदीप...

देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व प्रथम आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे बलीदान,स्मृती दिनानिमित्त प्रदीप वाघ यांचे प्रतिपादन.

333

आशाताई बच्छाव

1001466086.jpg

देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व प्रथम आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे बलीदान,स्मृती दिनानिमित्त प्रदीप वाघ यांचे प्रतिपादन. पालघर :सौरभ कामडी
मोखाडा तालुक्यातील आदिवासी समाजाचे कार्यकर्त्यांनी
ठाणे कारागृहातील स्मृती स्थळावर जाऊन
सह्याद्रीच्या ढाण्या वाघ आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना अभिवादन केले.
यावेळी प्रदीप वाघ यांनी सांगितले की देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या हुतात्मा मध्ये आदिवासी समाज अग्रभागी होता आणि वीर राघोजी सर्वात आधी शहीद झाला हा खरा इतिहास आहे आणि तो लोकां पर्यंत पोहचला पाहिजे.
आज महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कडे कपारीमधील कार्यकर्ते राघोजी चे वारसदार या ठिकाणी आलेले आहेत,या गोष्टी ची सुरवात वंदनीय मधुकर राव पिचड साहेब व डॉ गोविंद गारे साहेब यांच्या मुळे झाली असेही वाघ यांनी सांगितले.
यावेळी प्रदीप वाघ यांच्या सोबत आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती चे सचिव संजय वाघ, जिल्हा बँक चे संचालक दिलीप पटेकर योगेश खोरगडे सर, विठ्ठल गोडे, नंदकुमार वाघ, देवीदास पेहरे, सुरेश वाघ, मयुर मुकणे महादेव कोळी समाज चिटणीस प्रदीप वारघडे,सुरेश भांगरे सर, संदीप भांगरे,स्वराज पुंडलिक पाटील इत्यादी पदाधिकारी मोखाडा तालुक्यातुन उपस्थित होते.

Previous articleसंतापजनक.. लहान बालकांच्या जीवाशी ठेकेदाराचा जीवघेणा खेळ.!
Next articleपशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.