Home भंडारा संतापजनक.. लहान बालकांच्या जीवाशी ठेकेदाराचा जीवघेणा खेळ.!

संतापजनक.. लहान बालकांच्या जीवाशी ठेकेदाराचा जीवघेणा खेळ.!

253

आशाताई बच्छाव

1001466073.jpg

संतापजनक.. लहान बालकांच्या जीवाशी ठेकेदाराचा जीवघेणा खेळ.!

पोषण आहार पॉकीटात आढळले बुरशीचे व कुजलेले अन्न

 

संजीव भांबोरे
भंडारा –साकोली जवळील कुंभली अंगणवाडीत शुक्रवार ०२ मे रोजी संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. येथील लहान मुलांच्या पोषण आहारात आता चक्क बुरशी लागलेले, कुजलेले निकृष्ट अन्न आढळून आल्याने तेथील जागृत जनतेने तात्काळ याचे व्हिडिओ फोटो “युवाराष्ट्र दर्शन” प्रतिनिधीला पाठविले आणि संबंधित पोषण आहार पुरवठा कंपनी व कंत्राटीवर लहान मुलांच्या जीवाशी खेळणे याबाबद गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी संतप्त मागणी केली आहे. यापूर्वीही येथे पोषण आहाराच्या पॉकीटात अळ्या व डोक्यांचे केस निघाले होते. याबाबद आता “साकोली मिडीया” प्रतिनिधी सध्या नागपूरातच असून “विभागीय आयुक्त, एकात्मिक महिला बालविकास प्रकल्प, कामठी रोड, पाटणकर चौक नागपूर” यांची भेट घेऊन हा संतापजनक प्रकार कुणामुळे झाला हे त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत.
काल ( शुक्र. ०२ मे ) स. १०:४५ ला अंगणवाडी केंद्र क्र. १ येथील सेविका मंगला मेश्राम केंद्रात आल्या. पोषण आहार मुलांना वाटप करण्यासाठी “कॉन्टेन सोयाबीन ग्रीट” हे पॉकीट उघडली असता त्याला बुरशी लागून अन्न कुजलेले होते व उग्र वास येत होता. सदर प्रकार कुंभली सामाजिक कार्यकर्ता अमित वैद्य यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने साकोली “युवाराष्ट्र दर्शन” प्रतिनिधीला यांचे व्हिडिओ फोटो पाठविले. व सांगितले की, जर हे बुरशीजन्य अन्न लहान बालकांच्या पोटात नजरचुकीने गेले असते तर येथे किती मुलांसोबत जीवघेणा खेळ झाला असता. ही पोषण आहाराचे पॉकीटांचा साठा तीन दिवसांपूर्वी अंगणवाडीत आलेला आहे. सदर पॉकीटे पूर्ण तपासून पाठविले नाही का.? या पॉकीटावर “युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड – टेकानाका कामठी, नागपूर” असा पत्ता असून उत्पादन दिनांक ०२/०४/२०२५ असे नमूद आहे. यापूर्वीही याच अंगणवाडीत पोषण आहारात अळ्या व डोक्यातील केस आढळले होते. या गंभीर प्रकारावर साकोली पर्यवेक्षकांचे लक्ष नाही का.? हा जनतेत प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर संबंधित पोषण आहार पुरवठा कंपनी आणि कंत्राटदारावर लहान मुलांच्या जीवाशी खेळणे या प्रकरणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये असा सवाल ग्रामस्थांनी उचलला आहे.
सदर संतापजनक प्रकार “युवाराष्ट्र दर्शन” कडे येताच प्रतिनिधी नागपूरात असून या गंभीर विषयी विभागीय आयुक्त, एकात्मिक महिला व बालविकास विभाग, पाटनकर चौक कामठी रोड नागपूर यांच्या निदर्शनास आणून दिला जाईल. आता याबाबद सडलेले बुरशीजन्य पोषण आहार लहान बालकांना पुरवठा करणे व त्यांच्या जिवाशी खेळणे याबाबद पुरवठा कंत्राटदार व निर्माण कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात का येऊ नये अशी संतापजनक मागणी जनतेमधून सुरू आहे. या गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर भंडारा जिल्हा एकात्मिक बाल विकास विभाग हादरले असून आता कुणाची चौकशी होऊन दंडात्मक कारवाई होते याकडे कुंभली वासीयांचे आतुरतेने लक्ष केंद्रित आहे.

Previous article52 व्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत पंकज वानखेडे यांचा सन्मान
Next articleदेशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व प्रथम आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे बलीदान,स्मृती दिनानिमित्त प्रदीप वाघ यांचे प्रतिपादन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.