Home पालघर मोखाडा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी वामन दिघा

मोखाडा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी वामन दिघा

267

आशाताई बच्छाव

1001377248.jpg

मोखाडा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी वामन दिघा

पालघर : सौरभ कामडी
मोखाडा तालुका पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून या बैठकीत पत्रकार वामन दिघा यांची अध्यक्ष पदी बिन विरोध निवड करण्यात आली आहे यावेळी उपाध्यक्ष म्हणून मकरंद बात्रे, नामदेव ठोंबरे तर सचिव पदी रवींद्र साळवे आणि खजिनदार पदी पत्रकार भाऊ वैजल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी मोखाडा तालुका पत्रकार संघाची स्थापन करण्यात आली यावेळी दरवर्षी वर्धापन दिनी एक लोकपोयोगी कार्यक्रम सुध्दा पत्रकार संघटनेकडून करण्यात येत असतो. तसेच पत्रकारांच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना मदत करणे रुग्णालयात फळ वाटणे आदी कार्यक्रम हाती घेण्यात येत असतात.
अध्यक्ष पदी निवड झालेले दिघा हे दैनिक पुण्यनगरी, प्रहार या मध्ये पत्रकार असून गेल्या कित्येक वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. डीएड ची पदवी मिळवलेले दिघा काही दिवस शिक्षक म्हणून सुध्दा त्यांनी काम केलेले असून आदिवासी ठाकूर समाजातील अनेक संघटनांत ते काम करीत असून आदिवासी भागाचे प्रश्न आपल्या लेखणीद्वारे त्यांनी अधिक प्रभावीपणे मांडलेले आहेत या शिवाय कृषी, पशू विभागाचा त्यांचा दांडगा अनुभव असून शेती विषयांवर त्यांनी प्रचंड लिखाण केलेले आहे संघटन कौशल्य असलेल्या दिघा यांना पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पद देताना अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांच्या यांनिवडीने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे यावेळी सल्लागार पत्रकार हनिफ शेख, भगवान खैरनार, दीपक गायकवाड न्यानेश्वर पालवे, रमेश शिंदे, अमोल टोपले, सद्दाम शेख, बाळू गांगुर्डे, रघुनाथ गांगुर्डे,दयानंद शिंदे आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleग्रामीण भागातील विद्यार्थी चक्क साधतात 12देशातील भाषेत संवाद. (
Next articleविद्यार्थ्यांकडून अनधिकृत शुल्कवसुलीप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिरिक्त आरोग्य अधिकाऱ्यांची तक्रार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.