आशाताई बच्छाव
ग्रामीण भागातील विद्यार्थी चक्क साधतात 12देशातील भाषेत संवाद. (विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)
श्रीमंत गो सं देवकर विद्यालय विरदेल ता शिंदखेडा जि धुळे येथील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जागतिक विद्यार्थी परिषदेचे शालेय स्तरावर आयोजन करून वेगवेगळ्या देशात बोलल्या जाणाऱ्या भाषा LANGUAGE CODING च्या माध्यमातून केले सादरीकरण
जागतिक विद्यार्थी शिखर परिषदेमध्ये भाषा आत्मसात करून सादरीकरण केले . विद्यार्थ्यांनी भविष्यवेधी शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जागतिक स्तरावरील भाषा GROUP LEARNING च्या माध्यमातून GLOBAL STUDENT SUMMIT 2025 चे आयोजन शालेय स्तरावर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त जागतिक स्विकार्यता असलेले विद्यार्थी घडविण्यासाठी NEP 2020 च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सादरीकरण केले. भारत, चीन, जपान, रशिया, नेपाळ ,अरब, जर्मनी, इटली ,आफ्रिका, ब्राझील व इंग्लंड या देशातील भाषेतून त्या देशाचे प्रतिनिधित्व केले
सदर उपक्रम हा विद्यालयातील इंग्रजी विषय शिक्षक श्री सुनिल चौधरी यांनी राबविला व विद्यालयातील स्काऊट जिल्हा प्रशिक्षण आयुक्त श्री चैत्राम निकम यांनी चित्रण केले
ह्या उपक्रमाचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जे एस पाटील व पर्यवेक्षक श्री एस एस गोसावी यांनी अभिनंदन केले






