Home जालना फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध लावल्याने  फुले अंबडेकरी अनुयायांना सार्थ...

फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध लावल्याने  फुले अंबडेकरी अनुयायांना सार्थ अभिमान ः अतुल सावे

15
0

आशाताई बच्छाव

1000275902.jpg

फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध लावल्याने
फुले अंबडेकरी अनुयायांना सार्थ अभिमान ः अतुल सावे
जयंती उत्सव निमित्त शाहिर शितल साठे, सचिन माळी यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम गाजला
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) ः रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जगाच्या पाठिवर तेवत ठेवण्यासाठी महात्मा ज्योतीराव फुले यांनी महाराजांची समाधी शोधून काढली ही गौरवशाली घटना फुले आंबेडकरी अनुयायांना अभिमानास्पद असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी एका कार्यक्रमात सांगीतले.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने जुना जालना गांधी चमन येथील मंगळवार रोजी नवयान शाहिरी जलसा शाहिर शितल साठे, सचिन माळी (महापुरूषांच्या पोवाडयांचा) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री सावे अध्यक्षपदावरून बोलत होते. ते पुढे बोलतांना म्हणाले की, फुले दाम्पत्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातल्यामुळे आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले नाव लौकीक करतांना दिसत आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी फुले यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणे ही त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, फुले दाम्पत्यांच्या महान कार्यामुळे समाजातील विषमता दुर होवून समतेचे विचार सर्वदुर पसरले आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी राष्ट्रहित जोपासण्यासाठी समतेच्या विचारांचा अवलंब करावा असे आवाहन श्री दानवे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जयंती दिनानिमित्त महात्मा ज्योतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.  आणि दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

Previous articleमहात्मा फुले जयंतीनिमित्त आज गौरव सन्मान पुरस्कार
Next articleविशाल महाराज त्रिवेदी यांच्या मधुर वाणीतून भागवत कथेचे आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here