Home नांदेड जिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी दारु दुकाने बंद

जिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी दारु दुकाने बंद

122

आशाताई बच्छाव

Screenshot_20220827-133025_Google.jpg

जिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी दारु दुकाने बंद
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यात बुधवार 31 ऑगस्ट 2022 रोजी श्री गणेश चतुर्थी हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे 9 सप्टेंबर 2022 रोजी जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात श्री गणेश विसर्जन मिरवणूका होवून विसर्जनाचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सव कालावधीत सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बुधवार 31 ऑगस्ट 2022 रोजी नांदेड जिल्ह्यातील दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी बुधवार 31 ऑगस्ट 2022 रोजी श्री गणेश स्थापने निमित्त जिल्ह्यातील सर्व एफएल-2, एफएल-3, सीएल-3, सिएलएफएलटीओडी-3 व एफएल/बिआर-2 व टिडी-1 अनुज्ञप्तीधारकांना अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

Previous articleशेतात काम करतांना सर्पदंशाने ६० वर्षीय शेतकऱ्यांचा मृत्यु
Next articleअहेरी नगर पंचायतचे शिष्टमंडळानी घेतली जिल्हाधिकारी साहेबाची भेट व विविध विषयांवर चर्चा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.