Home बुलढाणा शेतात काम करतांना सर्पदंशाने ६० वर्षीय शेतकऱ्यांचा मृत्यु

शेतात काम करतांना सर्पदंशाने ६० वर्षीय शेतकऱ्यांचा मृत्यु

132

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0018.jpg

शेतात काम करतांना सर्पदंशाने ६० वर्षीय शेतकऱ्यांचा मृत्यु

युवा मराठा वेब न्यूज पोर्टल प्रतिनिधी रविंद्र शिरस्कार,संग्रामपूर

संग्रामपूर तालुक्यातील तामगाव येथील ६० वर्षीय अल्पभूधारक शेतकरी शेतात काम करत असताना त्यांना सर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान घडली.

गावातील दिवाकर मनोहर घिवे यांना त्यांच्या शेतातच विषारी जातीच्या सापाने चावा घेतल्याने ते घरी आले. प्रथम खासगी दवाखान्यात उपचार करून त्यांना शेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे डॉक्टरांनी उपचारादरम्यान मृत घोषित केले.

शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी व एक मुलगा, नातवंड असा आप्त परिवार आहे.

त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी तामगावातील अनिल घिवे, चेतन घिवे, कैलास कडाळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

Previous articleसांगवीतील भाजीवाल्या काकांकडून विद्यार्थ्यांना वह्या वाटप …….
Next articleजिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी दारु दुकाने बंद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.