Home बुलढाणा अवकाळी पाऊस आणि हवालदिल शेतकरी

अवकाळी पाऊस आणि हवालदिल शेतकरी

15
0

आशाताई बच्छाव

IMG_20240302_083350.jpg

अवकाळी पाऊस आणि हवालदिल शेतकरी

महाराष्ट्र शेती क्षेत्रातील देशातील एक पुढारलेले राज्य आहे, तेव्हा सरकारने शेतकरी आणि ग्राहक अशा दोघांनाही दिलासा देणारी व्यवस्था उभारली गेली पाहिजे. तसेच अवकाळी पावसापासून शेतीला कसे वाचवता येईल याचा विचार झाला पाहिजे. विकसित होणारे तंत्रज्ञान त्यासाठी उपयोगात आणले पाहिजे. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने या परिस्थितीवर तोडगा काढून शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे. वारंवार होणाऱ्या नुकसानीला कंटाळून शेतकऱ्यांनी शेती करायची सोडून दिली तर देशापुढे संकट उभे राहील.
बदलत्या हवामानामुळे राज्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून अनेक संकटांचा सामना करत आहे. कधी अस्मानी संकट, तर कधी सुलतानी संकटाला सामोरा जात आहे.गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. या अवकाळी पावसाने काही लोकांचे बळी घेतले. मुकी जनावरे दगावली. अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, तूर आदी प्रमुख पिकांसह आंबा, केळी, पपई अशा प्रकारच्या फळबागांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. ज्याची आशा होती, त्याचीच पूर्ण माती झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
अचानक आलेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण नुकसान केले आहे. सरकारने अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे तातडीने करणे आवश्यक आहे
सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी शेतकऱ्यांना तलाठय़ाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. तसेच पीक विम्यासाठी 72 तासांत ऑनलाइन नोंदणी करावी. सरकारने असे आश्वासन दिले असले तरी सरकारी मदत पदरात पडेपर्यंत काही खरं नसते हा आजवरचा अनुभव आहे. सत्तेवर असलेले हे सरकार फक्त जाहिरात करण्यात वाकबगार आहे.एकीकडे नैसर्गिक संकट, तर दुसरीकडे सोयाबीन भाव नाही
हा कोणता न्याय आहे?
प्रत्येक पिकाचा आढावा घेतला तर अत्यंत विदारक चित्र दिसेल.
अनुदानाने
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. कारण कोणतेही पीक घेण्यासाठी शेतकऱ्याला प्रत्येक टप्प्यावर खर्च करावा लागतो.
हे सरकारने लक्षात घ्यावे.
शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून असली तरी सरकारच्या दृष्टीने शेती व शेतकरी यांना दुर्लक्षित आणि दुय्यम स्थान राहिले आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी कृषी क्षेत्राच्या विकासाच्या बाबतीत भरभरून बोलत असतात. काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासाबाबतीत कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. फक्त खतामध्ये अनुदान दिले. वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत आहोत, पण शेतीवरील उत्पन्न दुप्पट कारण्यासाठी हे पुरेसे आहे काय? शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट न होता ते कमी होत आहे. शेतकऱ्याला मदतीचा हात न देणे सरकारला परवडणारे नाही. कारण त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. महाराष्ट्र शेती क्षेत्रातील देशातील एक पुढारलेले राज्य आहे, तेव्हा सरकारने शेतकरी आणि ग्राहक अशा दोघांनाही दिलासा देणारी व्यवस्था उभारली गेली पाहिजे. तसेच अवकाळी पावसापासून शेतीला कसे वाचवता येईल याचा विचार झाला पाहिजे. विकसित होणारे तंत्रज्ञान त्यासाठी उपयोगात आणले पाहिजे. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने या परिस्थितीवर तोडगा काढून शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे. वारंवार होणाऱ्या नुकसानीला कंटाळून शेतकऱ्यांनी शेती करायची सोडून दिली तर देशापुढे संकट उभे राहील.
— स्वप्निल देशमुख ( सहसंपादक दै.युवा मराठा बुलढाणा)

Previous articleश्रीरामपूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर
Next articleअशोकराव चव्हाण यांच्या उपस्थित कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व बहुसंख्य संचालक यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here