Home नाशिक तारुखेडले येथे आजपासून मुळ मुक्ताई माता यात्रोत्सव

तारुखेडले येथे आजपासून मुळ मुक्ताई माता यात्रोत्सव

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20240217_161315.jpg

तारुखेडले येथे आजपासून मुळ मुक्ताई माता यात्रोत्सव

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

निफाड तालुक्यातील तारुखेडले येथील मुळ मुकाई माता यात्रोत्सव आज शनिवारपासून सुरू होत आहे. यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती यात्रा समितीने दिली आहे.यात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी 8 वाजता मुळ मुकाई माता मंदिरात अभिषेक व पूजा आरती होणार आहे. सायंकाळी 4 ते 7 वाजता गावातून मुळ मुकाई माता प्रतिमेची सजवलेल्या रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात येणार आहे. रात्री करमणुकीसाठी विठाभाऊ मांग नारायणगावकर तमाशा मंडळ यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी संध्याकाळी 9 ते 12 पांडुरंग मुळे यांचा लोक नाट्य तमाशा होईल दिवसभर ग्रामस्थ
मुळ मुकाई माता मंदिरात सत्यनारायण पूजा करतात. दुपारी कुस्त्यांची दंगल होणार आहे. यात 101 ते 1001 रुपयांचे बक्षीस देऊन यशस्वी मल्लांना गौरविण्यात येणार आहे. यात्रेनिमिताने मंदिराला रंगरंगोटी
करण्यात आली असून, मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. यात्रेनिमित्ताने विविध खेळणी, मेवा मिठाई, रहाट पाळणे आदी दुकाने थाटण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवस सुरू राहणाऱ्या यात्रेची ग्रामस्थ व यात्रा उत्सव समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. परिसरातील भाविकांनी यात्रोत्सवातील विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleउदयनदादा गडाख यांच्या नेतृत्वाखाली उद्धवजी ठाकरे यांचे सोनईत तरुणांकडून अभुतपूर्वक स्वागत !
Next articleवनसगावला शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रचे आयोजन —
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here