Home Breaking News ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकाचे पिक धोक्यात..

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकाचे पिक धोक्यात..

199
0

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकाचे पिक धोक्यात..मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार,(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यात वातावरणातील बदल व ढगाळ वातावरणामुळे तूर हरभरा ज्वारी गहू भाजीपाल्यांच्या करडी अशा अनेक पिकावर रोगांचा प्रार्दुभाव होत आहे ढगाळ वातावरणात हरभरा करपून जात आहे भारलेल्या तुरीच्या पिकाचे प्रचंड नुस्कान होत आहे पिके वाचवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे यावर्षी प्रतीवर व अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकाची रास करता आली नाही याकाळात अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतात पाणी साचले होते शेतात जास्त प्रमाणात ओलावा असल्याने रब्बी साठी लवकर करता आली नाही पावसामुळे शेतात झालेले गवत काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पदरमोड करावी लागली शेतकरी आणि शेतातील साफसफाई करून हरभरा गहू ज्वारी पिकाची लागवड केली पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे तुरीचे पिक चांगले आले होते परंतु ढगाळ वातावरणामुळे त्यांचा फटका बसला आहे किडीचे प्रमाण वाढले असून तुरीचे फुले गळून पडत आहेत मशागतीनंतर रब्बीची पेरणी झाली शेतातील असलेल्या हरभरा तूर हे पिके अक्षरश करपून जात आहेत या वर्षाच्या परतीच्या पावसामुळे खरीप पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा रब्बी पिकांवर होत्या परंतु सुरु असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पडलेल्या रोगामुळे हाती काही पडते की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे

Previous articleमुखेड तालुक्यातील जाहूर बुथवर पदवीधर मतदान शांततेत पार मतदानाची टक्केवारी 58 .82% इतकी
Next articleऔरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकसाठी जिल्ह्यात ६४.०७ टक्के मतदान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here