Home नाशिक वनसगावला शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रचे आयोजन —

वनसगावला शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रचे आयोजन —

62
0

आशाताई बच्छाव

IMG_20240217_161916.jpg

वनसगावला शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रचे आयोजन —

महान तपस्वी महंत १०८ सोमेश्वर नंदगिरी जी महाराज शिवटेकडी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शोभायात्रा

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

वनसगाव तालुका निफाड येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवरायांची शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरा केला जाणारा असून सोमवार 19 फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता तपस्वी महंत 108 सोमेश्वर नंदगिरी जी महाराज शिवटेकडी यांच्या प्रमुख उपस्थितीत वनसगाव मुंजाबा फाटा ते वनसगाव ग्रामपंचायत शिव पुतळा अशी भव्य दिव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात येणार आहे अशी माहिती शिवजयंती उत्सव समिती वनसगाव यांच्या वतीने देण्यात आली आहे ‌‌
शिवजन्मोत्सव भव्य शोभा यात्रे त वनसगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रत्येक वर्गाच्या वतीने लेझीम, ढोल, पताका, बॅनर, झांज नृत्य घेऊन शोभा यात्रेच्या प्रारंभी पासून सहभाग राहणार असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य सी डी रोटे सर यांनी दिली आहे. तसेच वनसगाव ग्रामस्थ जय बाबाजी भक्त परिवार जय मल्हार मित्र मंडळ, तरुण मित्र मंडळ ,समस्त ग्रामस्थ, विश्वनाथ शिवालय समिती, वनसगाव सप्ताह कमिटी व भजनी मंडळ, आबाल वृद्ध व मोठ्या संख्येने माता भगिनी वितरूनाई सहभाग नोंदवणार आहे. मिरवणूक केला मुंजाबा फाट्यापासून सकाळी आठला प्रारंभ होणार असून वनसगाव ग्रामपंचायत येथील शिव पुतळ्यासमोर विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्यावर व्याख्यान होणार आहे. या ठिकाणी छत्रपती शिवरायांची पूजन होऊन महाआरती घेतली जाणार आहे तसेच मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार शिवव्याख्याते शिवचरित्रकार ह भ प ओम महाराज अटकळ आळंदी यांचे शिवचरित्रावर कीर्तन होणार आहे.
तरी आपल्या राजाची जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असेही आव्हान शिवजयंती उत्सव समिती वनसगाव पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव यावर्षी असंख्य तरुणांच्या सहकार्याने व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांच्या मार्गदर्शनाने भव्य शोभायात्रा व शिवचरित्रावर कीर्तन होऊन संपन्न होणार असून सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी सहकार्य करावे हीच आपणास कळकळीची विनंती जय महाराष्ट्र!!

अभिजीत शिंदे पाटील- अध्यक्ष शिवजयंती उत्सव समिती वनसगाव

Previous articleतारुखेडले येथे आजपासून मुळ मुक्ताई माता यात्रोत्सव
Next articleदेगलूर तालुक्यात विविध ठिकाणी शिवसेना-युवा सेनाच्या शाखेच्या नामफलकाचे अनावरण.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here